बॉलिवूडमधील प्रसिध्द अभिनेता रणदीप हुड्डा, ज्याने 'रंगरसिया'मधील 'राजा रवि वर्मा'ची व्यक्तिरेखा जिवंत केली आहे, अशा कलाकारांच्या यादीत त्यांचा समावेश आहे. एखाद्या भूमिकेत स्वता:ला वाहून टाकणे यामध्ये तो पारंगत आहे. पुन्हा एकदा रणदीप हुड्डा बायोपिकमध्ये काम करणार आहे आणि या प्रोजेक्टची व्यक्तिरेखा लक्षात घेऊन त्याने एक मोठे काम पूर्ण केले आहे. चला जाणून घेऊया यावेळी कोणाच्या बायोपिकसाठी रणदीपने काय काम केले आहे.
रणदीप हुड्डा (Randeep Hooda) स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बायोपिकमध्ये दिसणार आहे. आपली भूमिका लक्षात घेऊन रणदीपने यावेळी 18 किलो वजन कमी केले आहे. गोव्यात (Goa) सुरू असलेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (IFFI 53rd) या अभिनेत्याने सांगितले की, 'मी खूप दिवसांपासून माझे वजन कमी करत आहे. कारण सावरकरांची भूमिका साकारण्यासाठी मला वजन कमी करायचे होते.ती भुमिका आत्मसात करण्यासाठी पुर्ण प्रयत्न करतो.
रणदीपने सोशल मिडियावर गोव्यातील इफ्फीचे फोटो शेअर केले आहे. रणदीप हुड्डाने पहिल्यांदाच वजन कमी केलेलं नाही, तर याआधीही 2016 मध्ये 'सरबजीत'साठी त्याने 20 किलो वजन कमी केलं होतं. रणदीपने त्याच्या बायोपिकवर काम सुरू केले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.