Balrath Buses in Pernem: पेडणे येथे कार्यरत असलेल्या बालरथ बसेस बदलण्याची मागणी सध्या जोर धरू लागली आहे. पालकांनी तसेच पालक-शिक्षक संघटना, मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी पेडणे तालुक्यातील बालरथ बसमधून प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबद्दल चिंता व्यक्त केली आहे. त्यांच्या मते या बसेस जुन्या झाल्या असून असुरक्षित आहेत.
या बसेस जवळपास 12 वर्षे जुन्या आहेत आणि शेकडो विद्यार्थ्यांची वाहतूक करण्यास अयोग्य आहेत. या बसेसच्या दुरुस्तीसाठी लागणारा निधी अपुरा आहे. तसेच या वाहनांची देखभाल होत नाही आणि यामध्ये वारंवार बिघाड होत राहतो.
विद्यार्थ्यांना वाहतूक उपलब्ध करून देणे हा सरकारचा एक चांगला उपक्रम होता, पण या बसेसची अवस्था वाईट आहे. या वाहनांच्या देखभालीसाठी दिले जाणारे अनुदान अपुरे पडत असल्याने त्यांची मोडतोड सुरूच आहे.
मी सरकारला विनंती करेन की, मुलांची सुरक्षितता लक्षात घेऊन या बसेस रद्द कराव्यात आणि त्याऐवजी नवीन बस आणाव्यात, असे मत एका पालकाने व्यक्त केले.
आमदार आणि मंत्र्यांचे पगार आणि सुविधा वाढवण्याऐवजी मुख्यमंत्र्यांनी जे शिक्षणमंत्री आहेत त्यांनी या बसेसमध्ये गुंतवणूक करून विद्यार्थ्यांना सुरक्षित वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम करावे, असे आणखी एका पालक-शिक्षक संघटना सदस्याने निदर्शनास आणून दिले.
बालरथ बसेसची अवस्था खूप वाईट आहे. खूपशा बसेस या गंजलेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे ही वाहने लवकरात लवकर बदलावीत, अशी मागणी पालक करत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.