विनयभंग करणाऱ्या 'त्या' शिक्षक व पोलिसावर कारवाई करा; ‘एनएसयूआय’चे विद्यापीठाच्या कुलगुरूंना निवेदन

मागील सहा महिन्यांत अशा प्रकारच्या तीन घटना घडल्या
NSUI Goa
NSUI GoaDainik Gomantak

Goa University: मागील सहा महिन्यांत तीन विनयभंगाच्या घटना गोवा विद्यापीठातील विद्यार्थिनींसोबत घडल्या; परंतु या प्रकरणांबाबत कारवाई करण्यास विद्यापीठ समिती निष्क्रिय ठरली असल्याने कुलगुरू प्रो. हरिलाल मेनन यांनी तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी एनएसयूआय गोवाचे अध्यक्ष नौशाद चौधरी यांनी केली.

ते गोवा विद्यापीठात कुलगुरू प्रो. हरिलाल मेनन यांना निवदेन दिल्यानंतर माध्यमांशी बोलत होते. यावेळी इतर कार्यकर्तेदेखील उपस्थित होते.

दरम्यान चौधरी म्हणाले, विद्यापीठातील विद्यार्थिनी इंटर्नशीपसाठी पोलिस स्थानकात गेली असता तेथील पोलिसांद्वारे तिचा विनयभंग करण्यात आला. त्याचसोबत विद्यापीठातील एका प्राध्यपकानेदेखील विनयभंग केला.

मागील सहा महिन्यांत अशा प्रकारच्या तीन घटना घडल्या; परंतु विद्यापीठाद्वारे कारवाई करण्यात आली नाही. विद्यापीठातील विद्यार्थ्यांना सुरक्षा प्रदान करण्यात विद्यापीठ असमर्थ ठरत आहे.

NSUI Goa
Nathuram Godse: महात्मा गांधींची हत्या करणारा नथुराम गोडसे हा देशाला शाप; राज्यपालांचे धाडसी विधान

चौधरी यांनी उपस्थित केलेले प्रश्‍न

विनयभंग किंवा अशा स्वरूपाच्या घटना घडल्यास १९ दिवसांच्या आत कारवाई करावी लागते; परंतु तसे काही होताना दिसत नसून पोलिस अधिकाऱ्यांवर अजून कारवाई करण्यात आलेली नाही.

विद्यापीठात कोण येते, कोण जाते याबाबत काहीच सुरक्षा नाही. पोलिसांची गस्तदेखील योग्यप्रकारे नाही. विद्यापीठात अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरेदेखील नाहीत, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.

विद्यापीठात जे सुरक्षा रक्षक आहेत, ते एका खासगी कंपनीद्वारे पुरविले जातात. गोवा मानवी संसाधन महामंडळाद्वारे होमगार्डची नेमणूक येथे का केली जात नाही, असादेखील प्रश्‍न आहे.

या आहेत मागण्या...

  1. विनयभंग करणाऱ्या पोलिस तथा प्राध्यापकावर तत्काळ कारवाई व्हावी.

  2. विद्यापीठात सीसीटीव्ही लावावेत.

  3. पोलिसांद्वारे गस्त घालण्यात यावी.

  4. खासगी कंपनीच्या सुरक्षा रक्षकांऐवजी होमगार्डची नेमणूक करावी.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com