Tiswadi Land Conversion: भूखंडाबाबतीत कुठेही, काहीही लपवलेले नाही; राज्यमंत्री श्रीपाद नाईक

Shripad Naik: प्रक्रियेमध्ये काय‌द्याचा भंग झाला असेल तरीही मी माझा अर्ज मागे घेईन असे केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी म्हटले आहे
Shripad Naik: प्रक्रियेमध्ये काय‌द्याचा भंग झाला असेल तरीही मी माझा अर्ज मागे घेईन असे केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी म्हटले आहे
Shripad Naik Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : पानवेल-तिसवाडी येथे १२ हजार ५६० चौरस मीटरचा भूखंड झुडुपाखालील विभागातून रूपांतरित करून वस्तीसाठी करण्यात आला. या प्रक्रियेला माझ्याकडून कोणताही दबाव आणण्यात आलेला नाही. या प्रक्रियेला ८ महिने लागले, यातूनच सारे काही समजते. तरीही या प्रक्रियेमध्ये कुठल्याही काय‌द्याचा भंग झाला असेल, अथवा गोवा सरकारने आणलेला हा कायदाच चुकीचा असेल तरीही मी माझा अर्ज मागे घेईन, असे केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी म्हटले आहे.

गाजणाऱ्या भू-रूपांतर प्रकरणात त्यांचे नाव घेतले जात आहे. त्याविषयी आपली बाजू मांडताना त्यांनी नमूद केले की, भूखंड सर्व्हे क्र. १०/५ आणि १०/६ हे तिसवाडी तालुक्यातील पानवेल गावात आहेत. दोन्ही मिळून १४ हजार २२५ चौरस मीटरचा हा भूखंड आहे. ही जमीन गेल्या २० वर्षांपासून माझ्या कुटुंबाकडे आहे.

२०२१ साली पत्नीच्या निधनानंतर मी ठरवले की, तिच्या नावाने ही जमीन सामाजिक कार्यासाठी समर्पित करावी. ही कल्पना मी भाजपच्या नेत्यांशी बोलून दाखवताच मला सर्वांनी नगरनियोजन काय‌द्यातील नव्या तरतुदीनुसार भू-रूपांतर करून घेण्याचा सल्ला दिला. काय‌द्यानुसार ते शक्य असल्यामुळे मी जुलै २०२३ मध्ये नगरनियोजन खात्याकडे रितसर अर्ज केला, तसेच वेळोवेळी शुल्क भरले.

नगरनियोजन काय‌द्यातील तरतुदीनुसार निरीक्षण पथकेही जमिनीचे निरीक्षण करून गेली. सुमारे ८ महिन्यांच्या कालावधीनंतर फेब्रुवारी २०२४ मध्ये १२ हजार ५६० चौरस मीटरचा हा भूखंड रूपांतरित झाला. कायदेशीर मार्गाने तसेच सर्व सोपस्कार पार पडल्यावरच हा भूखंड रूपांतरित झाला. यात कुठेही व कसल्याही स्वरूपाचा राजकीय दबाव माझ्याकडून टाकला गेला नाही. ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी ८ महिन्यांचा अवधी लागला, यातच सर्वकाही आले.

Shripad Naik: प्रक्रियेमध्ये काय‌द्याचा भंग झाला असेल तरीही मी माझा अर्ज मागे घेईन असे केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी म्हटले आहे
Mandrem Land Conversions: मांद्रेतील जमीन रूपांतरे थांबवा! माजी आमदार सोपटेंची मागणी

कुठेही लपवाछपवी नाही

माझ्या दिवंगत पत्नीच्या (कै. विजया श्रीपाद नाईक) कुटुंबाकडून तिला ही जमीन भेट स्वरूपात दिली होती. याच कारणासाठी माझ्यासाठी हा व्यवहाराचा प्रश्न नसून भावनेचा विषय आहे. मी निवडणुकीसाठी सादर केलेल्या प्रत्येक प्रतिज्ञापत्रात या जमिनीचा उल्लेख आहे. केंद्रीय मंत्री या नात्याने पंतप्रधान कार्यालयाला दरवर्षी सादर केलेल्या अहवालात या जमिनीचा उल्लेख आहे. कुठेही, काहीही लपविलेले नाही आणि तो माझा स्वभावही नाही, असेही नाईक म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com