Panjim Municipality: पणजीत व्यावसायिक करात बंपर सूट; ‘मनपा’चा निर्णय

प्रति चौ.मी. 712.50 वरून 237.60 रुपयांवर आणला कर
Panjim Municipality
Panjim MunicipalityDainik Gomantak
Published on
Updated on

Panjim Municipality: पणजी महापालिकेने यावर्षी नागरिकांना दिलासा दिला आहे. घरपट्टीत कोणतीही वाढ केली नसून, 1 एप्रिलपासून 2023-24 या आर्थिक वर्षासाठी त्यात कोणताही बदल होणार नाही. मात्र, व्यावसायिक करामध्ये जी वर्गवारी केली होती, त्यात आता सामायिकीकरण केले आहे.

त्यामुळे प्रतिचौरस मीटर 712.50 रुपयांवरून आता व्यावसायिक कर म्हणून महापालिका केवळ 237.60 रुपये आकारणार आहे. त्यामुळे व्यावसायिकांना प्रति चौ.मी. 474.90 रुपयांची बंपर सूट मिळाली आहे.

Panjim Municipality
World Wildlife Day 2023 : जखमी वन्यपशूंचा जीव वाचणे येथे कठीण!

पणजी महापालिकेकडून व्यावसायिक व कार्यालयांसाठी जो कर आकारला जात होता, तो कमी करावा, अशी मागणी केली होती. अगोदरच रस्ते खोदकामामुळे जनता त्रासली आहे. दररोज अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे जनता नाराजी व्यक्त करत आहे.

त्यातच घरपट्टी आणि व्यवसाय कर वाढविला तर जनतेचा रोष वाढू शकतो, हे लक्षात घेऊन मंत्री बाबूश मोन्सेरात आणि महापौर रोहित मोन्सेरात यांनी घरपट्टी दर कायम ठेवला. शिवाय व्यावसायिक कर कमी करण्याच्याही सूचना केल्या.

विरोधकांकडूनही व्यावसायिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याची टीका केली जात होती. त्याची दखल घेऊनच व्यवसाय करात कपात करण्याचा निर्णय मोन्सेरात यांनी घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.

Panjim Municipality
Babush Monserrate : बाबूश यांच्‍या हस्‍तक्षेपामुळे पोलिसांसोबत संंबंध ताणलेले

फ्लॅट, बंगल्याच्या घरपट्टीला महापालिकेकडून दिलासा

फ्लॅटसाठी दर प्रति. चौ. मी. 97.20 रुपये घरपट्टी आकारली जात होती, आताही तोच दर महापालिकेने कायम ठेवला आहे. बंगल्यासाठी प्रति. चौ. मी. 102 रुपये होता, तोही कायम राहिला आहे. व्यावसायिक करामध्ये यापूर्वी महापालिकेने वर्गीकरण केले होते.

परंतु आता सर्व कर सामायिक केले आहेत. त्यात व्यवसाय कर प्रति. चौ. मी. 712.50 रुपये आकारला जात होता, तो कमी करून महापालिकेने 237.60 रुपयांवर आणला आहे. त्यामुळे महापालिकेला काही प्रमाणात आर्थिक झळ बसणार असली तरी जनतेच्या रोषाला मात्र सामोरे जावे लागणार नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com