‘महिला संसदेचे’ आयोजन ठरला कोट्यवधी रुपयांचा फुसका बार

जेवणासाठी मात्र प्रचंड गर्दी, एसओपीचे उल्लंघन..
Panjim planning of women's parliament was disrupted
Panjim planning of women's parliament was disrupted Dainik Gomantak

पणजी (Panjim): राज्य सरकार, गोवा विधानसभा (Goa Assembly) आणि एमआयटी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पाच दिवशीय विविध प्रकारच्या संसदेचे आयोजन केले आहे. यापैकी महिला संसदेच्या (Women's Parliament) पहिल्या दिवशीच आयोजनाचा पुरता फज्जा उडाला. या कार्यक्रमाच्या उद्‍घाटनासाठी महिलांनी तोबा गर्दी केली होती. मात्र, नंतर मुख्य कार्यक्रम सुरू होताच त्यांनी घरची वाट धरली. त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्च करून आयोजित केलेल्या या कार्यक्रमाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले.

Panjim planning of women's parliament was disrupted
काँग्रेसच्या बदनामी षडयंत्राचा पर्दाफाश

महिला संसदेचे उद्‍घाटन केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते होणार होते. त्यांनीच या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. यानिमित्ताने आयोजकांनी या परिसरात लावलेले सरकारच्या मंत्र्यांचे पोस्टर पाहता ‘महिलांचे सशक्तीकरण कमी आणि सरकारचे ब्रँडिंग जास्त’ अशी स्थिती होती.

देशाचा अमृत महोत्सव आणि गोवा मुक्तीच्या हिरक महोत्सवानिमित्त ‘लोकशाहीचा उत्सव’ अंतर्गत महिला संसद, युवा संसद आणि पंचायत संसदेचे आयोजन केले आहे. यासाठी देशातील स्त्री सशक्तीकरणासाठी झटणाऱ्या देशातील मान्यवर वक्त्यांना आमंत्रित करण्यात आले होते. महिला संसदेचे उद्‍घाटन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते झाले. यावेळी केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक, सभापती राजेश पाटणेकर, आमदार चर्चिल आलेमाव, माजी मंत्री निर्मला सावंत, एमआयटीचे सीईओ राहुल कराड उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी सरकारच्या विविध योजनांची माहिती देऊन राज्य सरकार महिलांच्या सशक्तीकरणासाठी विविध उपक्रम राबवत आहे, असे सांगत महिलांच्या सुरक्षेसाठी यापुढेही विशेष प्रयत्न करेल, असे सांगितले.

Panjim planning of women's parliament was disrupted
...पण माझ्या मनात प्रचंड भावनिक कोलाहल

जेवणासाठी प्रचंड गर्दी, एसओपीचे उल्लंघन

या कार्यक्रमासाठी अडीच हजार महिला येतील, अशी आयोजकांची अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात त्याहून अधिक महिलांनी नोंदणी केली. कार्यक्रम उशिरा सुरू झाल्याने जेवणाच्या ठिकाणी प्रचंड गोंधळ उडाला. तेथे कोरोना ‘एसओपी’चे सर्वत्र उल्लंघन होताना दिसले.

सभागृहात मंत्र्यांची पोस्टरबाजी : महिला आणि युवकांच्या सशक्तीकरणासाठी या संसदेचे आयोजन केले आहे. मात्र, सभागृहात आणि सभागृहाबाहेर सर्वत्र सावंत मंत्रिमंडळातील सर्वच मंत्र्यांचे मोठी पोस्टरबाजी करण्यात आली. त्यामुळे या कार्यक्रमात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप सरकारने ‘राजकीय’ डाव साधला, असेही बोलले जात होते.वर अत्यंत ढिसाळ आयोजन

राज्य सरकार आणि खाजगी संस्थेच्यावतीने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचे नियोजन अत्यंत ढिसाळ होते. त्यात साऊंड सिस्टिम योग्य नव्हती. रेकार्डेड वंदे मातरमची टेप सुरू न झाल्याने उपस्थितांनीच वंदे मातरम सुरू केले तेव्हा अनेकांचे चेहरे पडले होते. वक्त्यांची भाषणेही ऐकू येत नव्हती. गचाळ नियोजनामुळे अखेर महिलांनी कार्यक्रमातून काढता पाय घेतला.

तिने जिंकली मने

ॲसिड हल्ल्यात जखमी झालेल्या दिल्लीतील लक्ष्मी अगरवाल हिने मात्र आज महिलांची मने जिंकली. कोणत्याही संकटांना सामोरे जाण्याची तयारी ठेवा. संकटांचे संधीत रूपांतर करा. प्रश्न आणि समस्या सर्वत्र सारख्याच आहेत. त्या सोडविण्यासाठी सक्षमपणे उभे रहा, असे सांगताना देशात ॲसिड विक्री पूर्णतः बंद झाली पाहिजे, असे तिने सरकारला आवाहन केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com