...पण माझ्या मनात प्रचंड भावनिक कोलाहल

बाबांनी म्हणजे स्व. मनोहर पर्रीकर यांनी देशासाठी आणि गोव्यासाठी केलेले कार्य लोकांच्या लक्षात राहील आणि मीही ते काम पुढे नेण्यासाठी सदैव प्रयत्न करीन
Utpal Parrikar accepted posthumous Padma Bhushan award presented of Manohar Parrikar by President Ramnath Kovind
Utpal Parrikar accepted posthumous Padma Bhushan award presented of Manohar Parrikar by President Ramnath Kovind Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: दरबार हॉल माझ्यासाठी खूपच महत्त्वाची जागा आहे. पहिल्यांदा या ठिकाणी बाबांसोबत (Manohar Parrikar) आलो होतो. तेव्हा त्यांनी देशाच्या संरक्षणमंत्री पदाची शपथ घेतली होती. आता त्यांनी देशासाठी व गोव्यासाठी केलेल्या कामाची पोचपावती म्हणून त्यांना मिळालेला सर्वोच्च नागरी पुरस्कार स्वीकारण्यासाठी आलो आहे. एकीकडे मनात प्रचंड अस्वस्थता आणि दुसरीकडे त्यांना मिळालेल्या सर्वोच्च नागरी पुरस्काराचा आनंद आहे. बाबांनी देशासाठी आणि गोव्यासाठी (Goa) केलेले कार्य लोकांच्या लक्षात राहील आणि मीही ते काम पुढे नेण्यासाठी सदैव प्रयत्न करीन, अशी भावनिक प्रतिक्रिया उत्पल पर्रीकर यांनी ‘गोमन्तक’कडे व्यक्त केली.

देशातील पद्म पुरस्कारांचे काल नवी दिल्ली येथे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते वितरण झाले. हा पुरस्कार स्वीकारताना उत्पल यांच्या डोळ्यासमोरून स्व. मनोहर पर्रीकर यांनी गोव्यासाठी आणि देशासाठी केलेले अतुलनीय कार्य तरळून गेले. ते भावनिक झाले होते.

राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलमध्ये गोव्याचे माजी मुख्यमंत्री व देशाचे माजी संरक्षणमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांना जाहीर झालेला मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते उत्पल पर्रीकर यांनी स्वीकारला.

Utpal Parrikar accepted posthumous Padma Bhushan award presented of Manohar Parrikar by President Ramnath Kovind
गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार जाहीर

लोकांच्या आणि राष्ट्राच्या सेवेतील साध्या पण दूरदर्शी आणि समर्पित जीवनाचा हा खरोखर सन्मान आहे. मनोहर पर्रीकर यांच्या त्या दूरदर्शी निर्णयांनी राज्याला नव्या उंचीवर नेले. देशाचे संरक्षणमंत्री म्हणून त्यांनी ऐतिहासिक निर्णय घेतले. ज्याने भारताला जगातील एक महान शक्ती बनण्याच्या मार्गावर आणले.

- डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

प्रत्येक गोमन्तकीयाची मान अभिमानाने उंचावणारा हा क्षण आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांचा आणि पर्रीकरांच्या असंख्य चाहत्यांचा उत्साह वाढविणारी ही आनंददायी घटना आहे.

- श्रीपाद नाईक, केंद्रीयमंत्री

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com