
पणजी: पर्वरीतील शिक्षा निकेतन ही शाळा गेल्या अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांसाठी एक अनोखा उपक्रम राबवत आहे. विद्यार्थी अवस्थेतील मुलांना पोहायला यावं म्हणून या शाळेकडून एक उपक्रम राबवला जातो. साधारण ३० दिवसांच्या या उपक्रमानंतर त्यांना थेट मांडवी नदीत पोहोण्याची संधी दिली जाते. शिक्षा निकेतनमध्ये शिकणाऱ्या मुलांनी मांडावी नदी पार केलीये, यामध्ये साधारणपणे ४० विद्यार्थ्यांचा सहभाग होता.
मांडावी ही गोव्यातील प्रसिद्ध नदी. शिक्षा निकेतनच्या शिक्षिकेने माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार लहानग्या मुलांना ही नदी सर करण्यासाठी प्रशिक्षण दिलं गेलं होतं आणि हे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर आता बेती येथील रईश मागोस ते कंपाल पणजी असे अंतर या मुलांनी पोहून पार केलं आहे.
शाळेने राबवलेल्या या उपक्रमामुळे पालक देखील खुश आहेत. मुलांना कमी वयात काहीतरी वेगळं शिकण्याची संधी मिळतेय आणि यासाठी त्यांनी शाळेचे देखील आभार मानले आहेत. शाळेकडून या उपक्रमाच्यावेळी पालकांना देखील मुलांसोबत नदीत पोहोण्याची संधी दिली गेली होती. "गोव्यात राहतो म्हणजे नदीत पोहोता आलंच पाहिजे" असं मत एका विद्यार्थ्यांच्या आईने व्यक्त केलं.
मुलांना देखील शाळेकडून राबवला जाणारा उपक्रम प्रचंड आवडला आहे. काही मुलं तर तिसऱ्यावेळा या उपक्रमाचा भाग बनली आहेत. नदी पोहून पार करणं हे त्यांच्यासाठी 'ऍडव्हेंचरच' होतं. उपक्रमाच्यावेळी पोहायला तरबेज म्हणून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना ८५० मीटर १ किलोमीटर पोहायची संधी मिळाली. पहिल्या दोन वेळा कठीण वाटलेला उपक्रम अगदीच सोपा असून केवळ केवळ १३ मिनिटात हे अंतर पार केल्याचं एका विद्यार्थ्याने सांगितलं.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.