Panjim: रुग्णवाहिका नव्हे 'फिरते प्रसुतीगृह'च; महिलेनं दिला गोंडस बाळाला, रक्षंदा राणेंची कौतुकास्पद कामगिरी, आरोग्यमंत्र्यांनी केलं कौतुक

Goa ambulance women delivery: गरोदर महिलेचा जीव वाचवण्यासाठी १०८ रुग्णवाहिकेतच तिची प्रसूती करण्यात आली.
Panjim
PanjimDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गरोदर महिलेचा जीव वाचवण्यासाठी १०८ रुग्णवाहिकेतच तिची प्रसूती करण्यात आली. आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी या कामगिरीचे समाज माध्यमावर कौतुक केले आहे.

त्यांनी समाज माध्यमावर दिलेल्या माहितीनुसार, १०८ रुग्णवाहिका सेवा आपल्या तातडीच्या प्रतिसादाने आणि तज्ज्ञ उपचारांनी जीव वाचवण्याचे कार्य अविरतपणे करत आहे. आपत्कालीन वैद्यकीय साहाय्यक रक्षंदा राणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आणखी एक गंभीर गरोदरपणाचा प्रसंग अतिशय तत्परता आणि कौशल्याने हाताळला.

त्यांना आज सकाळी लवकर आपत्कालीन कॉल मिळाल्यानंतर समाज आरोग्य केंद्र येथे ते पोचले. रुग्ण ४० आठवड्यांच्या गरोदरपणात होती आणि तिला सतत गर्भासंबंधी वेदना आणि रक्तस्राव होत होता. वेळ न घालवता रक्षंदा राणे यांनी रुग्णवाहिकेतच सुरक्षितपणे प्रसूती केली, ज्यामध्ये रुग्णाच्या नातेवाईक आणि पायलटने मदत केली.

Panjim
Goa Politics: "पांडुरंग मडकईकरांचा 'तो' लाचखोरीचा आरोप खोटा, सावंत यांच्या नेतृत्वाखाली सरकारचे इमानदारीने काम", खासदार अरुणसिंह यांचा निर्वाळा

बाळाचा जन्म सुरक्षित झाला आणि त्याचा एपीगार स्कोर १० होता. आई आणि बाळाची प्रकृती स्थिर केल्यानंतर त्यांना पुढील उपचारांसाठी आझिलो रुग्णालयात हलवण्यात आले. आपली मजबूत आपत्कालीन प्रतिसाद क्षमता लोकांचे प्राण वाचवण्यात सातत्याने महत्त्वाची भूमिका बजावत आहे, असे मंत्री विश्वजीत राणे यांनी म्हटले आहे.

एपीगार स्कोर प्रणाली

एपीगार स्कोर ही नवजात बाळाच्या आरोग्याची तातडीने केलेली मूल्यमापन प्रणाली आहे, जी जन्मानंतरच्या पहिल्या मिनिटाला आणि पाचव्या मिनिटात बाळाच्या शारीरिक स्थितीचे मूल्यमापन करण्यासाठी वापरली जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com