Panjim Municipality: राजधानी पणजी शहरात विविध अन्नपदार्थ विकणाऱ्या हातगाडेधारकांना मनपाने हटविले. मात्र त्यांचा प्रश्न कधी सुटणार, याचे उत्तर महापालिकेकडे नाही. सध्या शहरात अवैधपणे ठिकठिकाणी हातगाडे लावलेले दिसतात. याबाबत मनपा बाजार समितीचे अध्यक्ष असलेल्या नगरसेवकाकडे विचारणा केली असता, ‘आम्हाला याबाबत काहीच माहिती नाही’ असे उत्तर त्याने दिले.
मिरामार येथे पाणीपुरी, भेळ व इतर खाद्यपदार्थ विक्री करणारे स्टॉल्स लागत होते. तेथील सुशोभीकरणामुळे ते हटविण्यात आले. तर, डॉन बॉस्कोजवळील पार्किंग क्षेत्रात काही गाडेधारकांना परवानगी दिली होती. परंतु काहीजणांनी भांडी धुणे व खरकटे तेथील गटारात टाकण्यास सुरवात केली. एक-दोन वेळा समज देऊनही या गाडेधारकांच्या वागण्यात काही बदल झाला नाही.
शेवट त्यांना तेथूनही हटविण्यात आले. अखेर यातील काही गाडेधारकांनी भाड्याने गाळे घेऊन आपला व्यवसाय पूर्ववत सुरू केला आहे. मिरामार येथून हटविल्यानंतर भेळविक्रेत्यांनी आपला व्यवसाय पर्वरीला नेला आहे. तेथे आता फूडकोर्ट तयार झाले आहे. त्यातील अनेकजण आजही महापालिकेत येऊन आमच्या स्थलांतराचे काय, असा प्रश्न विचारत असतात.
सोपो कर आकारणार- बेंतो लॉरेन्स
महापालिका क्षेत्रात काही ठिकाणी पाणीपुरी विक्री करणारे स्टॉल्स नजरेस पडतात. त्यांना कोणी परवानगी दिली, याविषयी विचारणा केली असता मनपा अधिकारी कानावर हात ठेवतात. परंतु आता अन्नपदार्थ विक्री करणाऱ्या हातगाडेधारकांना कोणी परवानगी दिली, हे अनेक नगरसेवकांना माहीत आहे.
असे असले तरी त्याविषयी बोलणार कोण हाही प्रश्न आहे. त्यामुळे आता महापालिका बाजार समितीने या सर्व गाडेधारकांकडून सोपो कर आकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातून महापालिकेला महसूल मिळेल, असे बाजार समितीचे अध्यक्ष बेंतो लॉरेन्स यांनी ‘गोमन्तक’ला सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.