Miramar Goa: मिरामार येथे सौंदर्यीकरणाकडे कंत्राटदाराचे दुर्लक्ष; झाडे पाण्याविना सुकली

Miramar Goa: मिरामार येथील दोनापावला रस्त्यालगत किनाऱ्याच्या बाजूचा परिसर सुशोभित करण्यात येत आहे.
Miramar
MiramarDainik Gomantak
Published on
Updated on

Miramar Goa: स्मार्ट सिटींतर्गत मिरामार येथील दोनापावला रस्त्यालगत किनाऱ्याच्या बाजूचा परिसर सुशोभित करण्यात येत आहे. जो परिसर सुशोभित केला आहे, त्याकडे संबंधित कंत्राटदाराचे लक्ष नसल्याचे दिसत आहे. सुभोभित केलेल्या ठिकाणातील सौंदर्यीकरणासाठी लावलेली झाडे पाण्याविना सुकून गेली आहेत. त्याशिवाय या परिसरात स्वच्छतेचा अभाव दिसून येतो. उल्लेखनीय म्हणजे, या प्रकल्पावर कोट्यवधींचा खर्च केला जात आहे.

मिरामार येथील सार्वजनिक शौचालयाच्या बाजूला सुशोभीकरणाचे काम करण्यात आले आहे. तर पुढील बाजूला आणखी काम सुरू आहे. पण जे काम करण्यात आले आहे, तेथील झाडांना पाणी घालण्याचे कामही संबंधित कंत्राटदाराकडून होत नाही. स्मार्ट सिटींतर्गत या भागाचा कायापालट करण्यात येत आहे. याठिकाणी फूडकोर्टची उभारणी सुरू आहे. परंतु जे काम पूर्ण झाले आहे, त्याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे.

Miramar
Goa Traffic : अवजड वाहनांना मेरशी सर्कलपर्यंत येण्यास बंदी

सुशोभीकरण केलेल्या ठिकाणी दोन प्रवेशद्वार आहेत, ते दोन्ही प्रवेशद्वार खुली असल्याने सध्या या परिसरात ‘आओ-जाओ घर तुम्हारा’ असा प्रकार आहे. त्यामुळे सायंकाळनंतर याठिकाणी बिअर किंवा दारू पिणारे येत असावेत, याची साक्ष देणाऱ्या बाटल्या आणि टिन्स नजरेस पडतात. सुरक्षारक्षक असतात मात्र त्यांच्यासमोर बिनधास्तपणे कचरा टाकला जातो.

दरम्यान, स्मार्ट सिटींतर्गत ज्या भागाचे सुशोभीकरण केले आहे, त्यात व्यायामाचे साहित्यही ठेवण्यात आले आहे. परंतु याठिकाणचीही निगा व्यवस्थित राखली जात नसल्याच्या तक्रारी आहेत. महापालिकेच्या कार्यक्षेत्रात हा परिसर असला तरी त्याचे हस्तांतर अद्याप त्यांच्याकडे नाही. त्यामुळे महापालिकाही त्याकडे आत्मीयतेने पाहत नसल्याचे दिसते.

अभियंता कुठे असतो?

संबंधित कंत्राटदाराचे ते काम असेल तर त्याच्याकडून ते करून घेणे आवश्‍यक आहे, परंतु जे काम सुरू आहे, तेथे स्मार्ट सिटीचा एकही अभियंता दिवसभर उपलब्ध नसतो, अशी माहिती येथील कर्मचाऱ्यांंनी ‘गोमन्तक’ला दिली. त्यामुळे येथे सुरू असलेल्या कामाची पाहणी करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे वेळ आहे की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

नव्याने लावलेली झाडे जगवा...

कोट्यवधी रुपये खर्च करून या भागात सुशोभीकरण सुरू आहे. त्यासाठी येथील काही सुरूची झाडीही हटविण्यात आली. जी काही झाडी आहे, ती ठेवून त्याभोवताली पेव्हर्स टाकून परिसर सुशोभित केला जात आहे. परंतु सुशोभीकरणासाठी जी नव्याने झाडी लावली आहे, त्याकडे दुर्लक्ष होत आहे. पाण्याविना ही लावलेली झाडे सुकून गेली आहेत. जी राहिलेली झाडे आहेत, त्यांना पाणी न मिळाल्यास तीही सुकून जातील, अशी स्थिती आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com