Vasco School Accident: धक्कादायक! त्या मुलांचे केवळ दैव बलवत्तर म्हणून..

वास्कोत थरार : वर्ग सुरू असतानाच पडले स्लॅबचे प्लास्टर, विद्यार्थ्यांना पाठवले घरी
Vasco School Accident
Vasco School AccidentDainik Gomantak
Published on
Updated on

Vasco School Accident वास्को येथील सर्वांत जुनी शाळा म्हणजे सरकारी हायस्कूल (मेन). या शाळेच्या इमारतीला ऐन पावसाळ्यात गळती लागली असून आज, शनिवारी सकाळी या इमारतीच्या स्लॅबचे प्लास्टर अचानक निखळून पडू लागले.

विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाल्याने सर्व आठही वर्गांतील 100 विद्यार्थ्यांना शिक्षकांनी घरी पाठवले. यापुढे या शाळेतील वर्ग बंद ठेवून ते सोमवारपासून मांगोरहिल येथील सरकारी शाळेत हलविण्याचा निर्णय शाळा व्यवस्थापनाने घेतला आहे.

ही घटना आज, शनिवारी सकाळी घडली. या घटनेनंतर विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर काढून घरी पाठवण्यात आले. वास्कोचे आमदार कृष्णा साळकर यांनी त्वरित शाळेची पाहणी करून घटनेचा आढावा घेतला.

Vasco School Accident
LLB Entrance Exam: प्राचार्यांची स्वत:च्या पुत्रासाठी मेहेरनजर? विद्यार्थी 'न्याया'च्या प्रतीक्षेत..!

शाळेच्या नवीन इमारतीसाठी मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव मांडणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

भिंतींना लागतो ‘करंट’

स्लॅबचे प्लास्टर कोसळून पडण्याबरोबरच वर्गांच्या ओल्या झालेल्या भिंतींना स्पर्श केल्यास विजेचा शॉक लागत असल्याची धक्कादायक माहिती विद्यार्थ्यांनी दिली. यापूर्वीही स्लॅबचे तुकडे पडण्याचे प्रकार घडले होते.

मात्र, तात्पुरते प्लास्टर करण्यात आले. परंतु आज अचानक पुन्हा प्लास्टर निखळून पडू लागल्याने विद्यार्थ्यांसह शिक्षकही भयभीत झाले. शिक्षकांनी उसंत न घेता विद्यार्थ्यांना वर्गातून बाहेर काढले आणि घरी पाठवले.

Vasco School Accident
Goa Monsoon Update 2023: राज्यात ऑरेंज अलर्ट कायम; पडझडीच्या घटना वाढल्या

आमदार साळकर यांनी केली पाहणी

या इमारतीची वरच्या वर दुरुस्ती करून विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ खेळणे योग्य नाही. ही जुनी इमारत पाडून नवी इमारत उभारण्यात येणार आहे. या शाळा इमारतीचा वारसा भाग तसाच ठेवून दुरुस्ती करण्यात येईल. - दाजी साळकर, आमदार, वास्को.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com