बाबूश मोन्सेरातांचे खंदे समर्थकच त्यांच्या विरोधात

प्रतिक्रिया देण्यास पत्रकारांना टाळले; लोक बघून घेतील : बाबूश
Panjim MLA Babush Monserrat
Panjim MLA Babush MonserratDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: पणजी (Panjim) मतदरसंघातून मी निवडून आल्यानंतर केलेला विकास लोकांसमोर आहे. जर लोकांना विकास दिसत नाही, तर त्याला मी काय करणार. लोकांनी मी केलेली कामे पाहिली आहेत, पाहात आहेत व पाहणार आहेत. याव्यतिरिक्त मला कोणी केलेल्या वक्तव्यांवर मत व्यक्त करायचे नाही असे म्हणत पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात (Panaji MLA Babush Monserrat) यांनी काढता पाय घेतला. उत्पल पर्रीकर यांनी पणजीमधून निवडणूक लढविण्याचा निर्धार केल्यापासून मोन्सेरात हे खचले आहेत. भाजप उमेदवारीबाबत काय निर्णय घेतात याकडे त्यांचे लक्ष लागलेले आहे.

Panjim MLA Babush Monserrat
Goa Plan: ...पण गोवा पर्यटकांसाठी तयार आहे का?

पणजीमधून मनोहर पर्रीकर यांच्याविरोधात निवडणूक न लढविलेल्या बाबूश मोन्सेरात यांनी त्यांच्या निधनानंतर पणजीत काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडणूक लढवून भाजपचे उमेदवार सिद्धार्थ कुंकळ्येकर यांचा पराभव केला होता. कुंकळ्येकर यांनी पर्रीकर यांच्या जोरावर मोन्सेरात यांना 2017 मध्ये पराभूत केले होते. पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांचे मन वळविण्यासाठी राज्याचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी दोनवेळा त्यांच्याशी संवाद साधला. मात्र, आगामी निवडणूक लढविण्याबाबत त्यांनी निर्धार केला आहे व भाजपची उमेदवारी त्यांनाच मिळणार असा दावाही केला आहे.

Panjim MLA Babush Monserrat
‘महिला संसदेचे’ आयोजन ठरला कोट्यवधी रुपयांचा फुसका बार

नागरिकांत संताप; समर्थक नाराज

गेली अनेक वर्षे ताळगावात बाबूश मोन्सेरात यांचे वर्चस्व होते. मात्र, मंत्री जेनिफर मोन्सेरात या लोकांना भेटत नसल्याने तसेच ताळगावातील शेतजमिनींचे रूपांतर यामुळे लोक संतापले आहेत. मोन्सेरात यांचे खंदे समर्थकच आता त्यांच्या विरोधात गेले आहेत. प्रामाणिक व साधी राहणीमान असलेले तसेच लोकांशी संपर्कात असलेल्या टोनी रॉड्रिग्ज यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करून त्यांना आव्हान दिले आहे. त्यामुळे ताळगाव हा बाबूश मोन्सेरात यांचा बालेकिल्ला यावेळ अबाधित राहणार की नाही याबाबतच शंका आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com