Panjim: पणजीतील जीर्ण इमारत हटविणे सुरू; आपत्ती व्यवस्थापन समितीकडे काम

Panjim Old Building Demolition: इमारत पाडण्याचे काम सुरू असल्याने सांतिनेज ते आल्तिनो मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती
Panjim Old Building Demolition: इमारत पाडण्याचे काम सुरू असल्याने सांतिनेज ते आल्तिनो मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती
Panjim Old Building DemolitionDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: सांतिनेज, पणजी येथील जीर्ण झालेल्या इमारतीचा एक भाग सायंकाळी कोसळल्यानंतर शेजारील भाग तोडण्याचे काम आपत्ती व्यवस्थापन समितीने हाती घेतले. रात्री उशिरापर्यंत जेसीबीच्या साह्याने हे काम सुरू होते.

उत्तर गोवा जिल्हा व्यवस्थापन प्रमुख जिल्हाधिकारी स्नेहा गिते यांच्या उपस्थितीत हे काम सुरू होते. याप्रसंगी आमदार जेनिफर मोन्सेरात, महापौर रोहित मोन्सेरात, उपमहापौर संजीव नाईक, नगरसेवक उदय मडकईकर यांची उपस्थिती होती.

इमारत पाडण्याचे काम पहाटे उशिरापर्यंत चालेल. ज्यांची घरे धोक्याच्या छायेखाली आहेत, त्यांना काही नुकसानी झाली तर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन निर्णय घेईल, असे महापौर मोन्सेरात यांनी सांगितले.

Panjim Old Building Demolition: इमारत पाडण्याचे काम सुरू असल्याने सांतिनेज ते आल्तिनो मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती
Panjim Municipal Council: मासळी बाजाराचा पुनर्विकास निर्णय; रस्त्यांवरून खडाजंगी

लोकांना हलवले

इमारतीचा स्लॅब कोसळल्याची माहिती समजताच जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ आजूबाजूच्या घरातील लोकांना हलवण्याचे आदेश दिले. त्यानुसार व्यवस्थापनाने चार कुटुंबांची हॉटेलमध्ये राहण्याची सोय केली. इमारत पाडण्याचे काम सुरू असल्याने सांतिनेज ते आल्तिनो मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. अग्निशामक दलाने हॅलोजनद्वारे प्रकाशाची सोय करून दिल्याने हे काम गतीने सुरू होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com