Pandurang Madkaikar : ...तर भाजपला सोडचिठ्ठी देण्याची माझी तयारी : पांडुरंग मडकईकर

लोकसभेसाठी श्रीपाद नाईकांनाच उमेदवारी द्या; आरक्षणाच्या मुद्यावर ठाम
Goa BJP | Pandurang Madkaikar
Goa BJP | Pandurang MadkaikarDainik Gomantak
Published on
Updated on

अनुसूचित जाती (एसटी) समाजासाठी मतदारसंघ आरक्षित ठेवण्याबरोबरच एसटी, एससी आणि ओबीसी गटातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय क्षेत्रात पदव्युत्तर अभ्यासक्रमात राखीव जागा ठेवण्याचा निर्णय मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जाहीर केला आहे. हा निर्णय अंमलात न आणल्यास भाजपमधून बाहेर पडू, असे सांगत माजी मंत्री पांडुरंग मडकईकर यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर गोव्यातून श्रीपाद नाईक यांनाच उमेदवारी द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.

मडकईकर यांच्याशी ‘गोमन्तक''च्या प्रतिनिधीने संवाद साधला, त्यावेळी त्यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. मी केवळ कुंभारजुवे मतदारसंघापुरता मर्यादित नाही, तर संपूर्ण राज्यात मला मानणारा वर्ग आहे. आजही अनेक राजकीय पक्षांचे नेते माझ्या संपर्कात आहेत.

Goa BJP | Pandurang Madkaikar
Fire In Goa: काणकोण खोतीगावतील चापोली डोंगरमाथ्यावर आग, आगीचे कारण अस्पष्ट

...म्हणून विद्यार्थ्यांचे शिक्षण वाया

राज्यातील एसटी, एससी आणि ओबीसी गट अजूनही आर्थिकदृष्ट्या मागास आहे. या समाजातील लोक आपल्या मुलाला मोठ्या अपेक्षेने ‘एमबीबीएस’पर्यंत शिकवितात, परंतु नंतर पदव्युत्तर शिक्षणात ते विद्यार्थी स्पर्धा करू शकत नाहीत. आरक्षण नसल्याने त्यांना प्रवेश मिळत नाही. त्यामुळे पदवीपर्यंत घेतलेले शिक्षण वाया जाते, असे मडकईकर म्हणाले.

राजकीय आरक्षणही हवे

एसटी समाजासाठी गोवा वगळता सर्वत्र राखीव मतदारसंघ आहेत. त्यामुळे गोव्यातही तसे आरक्षण मिळावे, अशी अनेक कार्यकर्ते मागणी करत आहेत. मनोहर पर्रीकर मुख्यमंत्री असताना मी एसटी समाजासाठी राखीव मतदारसंघ ठेवण्याविषयी चर्चा केली होती. त्यांनी तशी तयारीही सुरू केली होती, असे मडकईकर यांनी नमूद केले.

Goa BJP | Pandurang Madkaikar
GMC Goa : ...तर खासगी रुग्णालयांची गय नाही : आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे

मडकईकर उवाच...

  1. मी सुदिन ढवळीकर यांना नेता मानत नाही. त्यांनी नेहमी स्वार्थ पाहिला. विधानसभा निवडणुकीवेळी तृणमूल काँग्रेसबरोबर गेल्याने मगोपवरील विश्‍वास उडाला. भाऊसाहेब बांदोडकरांनी रुजवलेली तत्त्वे आता उरली नाहीत.

  2. विधानसभा निवडणुकीत कुंभारजुवे मतदारसंघात मला उमेदवारी मिळू नये म्हणून अनेकांनी प्रयत्न केले. अनेक पक्षांच्या नेत्यांना पैसे वाटण्यात आले.

  3. एसटी समाजाच्या भाजपमधील दोन नेत्यांमध्ये सध्या चढाओढ सुरू आहे. हे दोन्ही नेते बहुजन समाजाची विभागणी करू पाहातात. परंतु बहुजन समाज सुज्ञ आहे, त्यामुळेच तो अद्याप एकत्र आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com