GMC Goa : ...तर खासगी रुग्णालयांची गय नाही : आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे

अत्यवस्थ स्थितीत रुग्णांना गोमेकॉत पाठवल्यास कारवाई
Forest Minister Vishwajit Rane
Forest Minister Vishwajit RaneDainik Gomantak
Published on
Updated on

GMC Goa: राज्यातील काही खासगी रुग्णालये रुग्णांवर अखेरच्या टप्प्यापर्यंत उपचार करतात. नंतर रुग्णाची प्रकृती चिंताजनक बनली की, त्यांना गोमेकॉत पाठवतात. परिणामी रुग्ण औषधोपचारांना प्रतिसाद देत नाही आणि दगावतो.

त्यामुळे प्रकृती खालावलेल्या रुग्णांना जी रुग्णालये गोमेकॉत पाठवतात, त्यांची गय केली जाणार नाही, असा सज्जड इशारा आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांनी दिला. प्रसंगी अशा रुग्णालयांचे परवानेही निलंबित केले जातील, असे त्यांनी सुनावले.

Forest Minister Vishwajit Rane
Vasco News: वाढते अपघात रोखण्यासाठी वास्को पोलीसांनी राबवलीय 'ही' विशेष मोहीम

खोतोडा येथील मेगा आरोग्य शिबिरात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी वाळपई आरोग्य केंद्राचे डॉ. विकास नाईक, डॉ. श्याम काणकोणकर, डॉ. वैभव गाडगीळ, अकीब शेख, संयोजक विनोद शिंदे, आरोग्य संचालिका डॉ. गीता काकोडकर, डॉ. गीता देशमुख, डॉ. आदित्य, केदार रायकर, प्रशांत सूर्यवंशी, खोतोडाचे सरपंच नामदेव राणे, नंदिनी म्हाळशेकर, सलोनी गावकर, नगरगाव जिल्हा पंचायत सदस्य राजेश्री काळे, श्रीराम हायस्कूलचे मुख्याध्यापक शिवाजी देसाई उपस्थित होते.

आरोग्यमंत्री राणे म्हणाले की, गोव्यातील विविध स्तरांवरील आरोग्य क्षेत्रात सुविधा निर्माण करण्याचे सरकारचे प्रयत्न आहेत. आरोग्य क्षेत्रात क्रांती घडत आहे. जनतेच्या दारापर्यंत आरोग्य सेवा पुरविण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

Forest Minister Vishwajit Rane
Fire In Goa: काणकोण खोतीगावतील चापोली डोंगरमाथ्यावर आग, आगीचे कारण अस्पष्ट

पायाभूत सुविधांवर देणार भर

गोव्यात नवनवीन प्रकल्प आणून पायाभूत सुविधा निर्माण करू. राज्यात युवकांसाठी रोजगार निर्माण करणे शक्य आहे. त्यामुळे पायाभूत सुविधांच्या उभारणीवर सरकार अधिक भर देत आहे.

युवकांना चांगली नोकरी व सुविधा देण्याचा प्रयत्न असून बेरोजगारांना येणाऱ्या दिवसांत रोजगार उपलब्ध होईल, असे आरोग्यमंत्री राणे म्हणाले.

‘गोमेकॉ’वर विश्वास

गोव्याच्या आरोग्य क्षेत्रात अत्याधुनिक सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे गोमेकॉच्या कारभारावरील जनतेचा विश्वास वाढला आहे.

दररोज ‘गोमेकॉ’मध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. थोडक्यात आरोग्य यंत्रणेवर विश्वास वाढल्याचे सिद्ध होते, असे आरोग्यमंत्री राणे म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com