"माऊलीच्या कृपेने जीव वाचला", पंढरपूरहून गोव्यात परतणाऱ्या वारकऱ्यांच्या गाडीचा भीषण अपघात; नेमकं काय घडलं वाचा

Goa Warkari Bus Crash: पंढरपूर येथील आषाढी वारी करून गोव्यात परतणाऱ्या वारकऱ्यांना आजरा-कोल्हापूर महामार्गावर भीषण अपघाताचा सामना करावा लागला.
Accident Pandharpur to Goa
Accident Pandharpur to GoaDainik Gomantak
Published on
Updated on

कोल्हापूर: पंढरपूर येथील आषाढी वारी करून गोव्यात परतणाऱ्या वारकऱ्यांना आजरा-कोल्हापूर महामार्गावर भीषण अपघाताचा सामना करावा लागला. बांद्याजवळ, दुसऱ्या पुलावरून भरधाव वेगात असलेली कार ओहोळातील पाण्यात कोसळून अपघातग्रस्त झाली. हा अपघात सोमवारी (दि.७) पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडला, ज्यात हातुर्ली-मये येथील चार वारकरी जखमी झाले. जखमींमध्ये तीन महिलांचा समावेश असून, त्यापैकी दोघांना गंभीर दुखापत झाली आहे.

अपघाताचे कारण आणि बचावकार्य

मिळालेल्या माहितीनुसार, शिवराम नागवेकर, त्यांच्या पत्नी कांचन नागवेकर, रत्नमाला चोडणकर आणि त्यांची मुलगी हे वारकरी पायी वारी करून पंढरपूरहून परत येत होते. रविवारी सायंकाळी मोटारगाडीतून त्यांचा परतीचा प्रवास सुरू झाला. आजरा येथे पोहोचल्यावर गाडीचा पुढचा टायर अचानक फुटला. यामुळे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी पलटी झाली.

अपघात घडल्यानंतर तात्काळ मदतकार्य सुरू करण्यात आले. जखमी वारकऱ्यांना तेथील स्थानिक रुग्णालयात प्राथमिक उपचार देण्यात आले. त्यानंतर, कांचन नागवेकर आणि रत्नमाला चोडणकर यांना गंभीर दुखापत झाल्याने तातडीने बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलवण्यात आले.

Accident Pandharpur to Goa
Ashadhi Ekadashi: काचेच्या पेल्यावरती, मोरपिसावरती 'विठ्ठल'! गोव्यातील आषाढी एकादशीचे खास Photos

विठू माऊलीच्या कृपेने बचावल्याची भावना

दोन्ही गंभीर जखमी महिलांवर गोमेकॉत उपचार केल्यानंतर, त्यांना रात्री त्यांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली. या भीषण अपघातातून बचावल्यानंतर, वारकऱ्यांनी "पंढरीच्या श्री विठू माऊलीची कृपा म्हणूनच आम्ही या अपघातातून वाचलो," अशी भावना व्यक्त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com