Usagaon Scrap Yards: डेंग्यूवर नियंत्रण ठेवण्यासाठी पंचायतीची मोहीम सुरु; सरपंचांनी दिली 'ही' महत्वाची माहिती

जनतेचे आरोग्य धोक्यात : उसगावात पावसाळी रोगांसंबंधी जनजागृती कार्यक्रम
Scrap Yards
Scrap YardsDainik Gomantak

Usagaon Scrap Yards उसगावात बेकायदेशीरपणे सुरू असलेले दोन भंगार अड्डे साथीच्या रोगांनाही कारणीभूत ठरू शकतात. त्यामुळे उसगावचे सरपंच नरेंद्र गावकर यांनी पुढील 4-5 दिवसांत हे भंगार अड्डे बंद करण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे.

पिळये-धारबांदोडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे पावसाळी रोगांसंबंधी जागृती कार्यक्रम सुरू करण्यात आले आहेत. यावर्षी डेंग्यू रोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी कर्मचारी सज्ज झाले आहेत.

धारबांदोडा तालुक्यातील पाचही पंचायत क्षेत्रांसह उसगाव पंचायत क्षेत्रात डेंग्यू रोग कशामुळे फैलावतो, याची माहिती स्थानिक ग्रामस्थांना देण्यात येत आहे.

Scrap Yards
Panjim News: 'त्या' चालवताहेत पित्‍याचा वारसा; पदवीधर युवतींचा तरुणांसमोर नवा आदर्श

गेल्या वर्षी या आरोग्य केंद्राच्या हद्दीत सुमारे डेंग्यूचे 23 संशयित रुग्ण आढळले होते. यावर्षी रुग्णांची संख्या कमी करण्यासाठी आरोग्य केंद्रातर्फे विविध ठिकाणी जागृती कार्यक्रम हाती घेण्यात आले आहेत.

धारबांदोडा, गांजे, मोले, नाणूस व अन्य भागांत आरोग्यविषयक कार्यक्रम आयोजित करून लोकांना मलेरिया व डेंग्यू रोगांसंबंधी माहिती देण्यात आली.

अड्डेमालकांना नोटीस बजावणार

गेल्या काही महिन्यांपासून उसगाव भागात दोन भंगार अड्डे सुरू झाल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. उसगाव पंचायतीने हे बेकायदेशीररित्या सुरू असलेले भंगार अड्डे पुढील 4-5 दिवसांत बंद करण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे.

ग्रामसभेतही ग्रामस्थांनी हे भंगार अड्डे बंद करण्याची मागणी केली होती. त्यानुसार पंचायतीतर्फे भंगार अड्ड्यांच्या मालकांना नोटीस देण्यात येईल, असे उसगावचे सरपंच नरेंद्र गावकर यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com