Panaji Police Action: पणजीत 'लेडी सिंघम' ठेवणार करडी नजर; 'साध्या वेशात' महिला पोलिस करणार बसचा प्रवास

Goa Police News: राजधानी पणजीत महिला आणि लहान मुलांची सुरक्षा वाढवणीसाठी पणजी महानगरपालिका, गोवा पोलिस आणि स्कॅन गोवा यांनी एकत्र येऊन एक उपक्रम हाती घेतला आहे
harassment control Goa
harassment control GoaDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राजधानी पणजीत महिला आणि लहान मुलांची सुरक्षा वाढवणीसाठी पणजी महानगरपालिका, गोवा पोलिस आणि स्कॅन गोवा यांनी एकत्र येऊन एक उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमात महिला पोलिस साध्या वेशात बसेसमधून प्रवास करणार आहेत.

महिला पोलिस साध्या वेशात नियमित प्रवास करतील, यामुळे राज्यातील महिला आणि लहान मुलांच्या विरोधात सुरू असलेल्या गुन्ह्यांवर आला बसेल अशी अपेक्षा बाळगली जात आहे.

harassment control Goa
Panaji: तापमान 35 अंशावर आणि पणजीत ‘लोडशेडिंग’! वारंवार वीज खंडित होत असल्‍याने नागरिक, व्यापाऱ्यांना फटका

शिवाय या विशेष मोहिमेबद्दल संपूर्ण शहरात ठिकठिकाणी होर्डिंग्स आणि बॅनर्स लावले जाणार आहेत. या होर्डिंग्स आणि बॅनर्समुळे स्थानिकांमद्धे वाढत्या गुन्ह्यांबद्दल जागृती निर्माण होईल.

पणजी महानगरपालिककडून सेफ्टी फास्ट हा उपक्रम सोमवार (दि. 12) पासून राबवायला सुरुवात केलीये. एखादे वेळी गरज पडल्यास महिला किंवा लहानमुलांच्या सुरक्षेसाठी काय करावं याची माहिती होर्डिंग्स आणि बॅनर्समधून लोकांना मिळेल. ज्या ठिकाणी जास्ती रहदारी असते त्या ठिकाणी अधिक प्रसिद्धी केली जाणार आहे.

शहरातील समुपदेशन केंद्र, शाळा आणि इतर प्रमुख ठिकणी या उपक्रमाबद्दल स्टीकर्स वाटले जाणार आहेत. यामध्ये उपक्रमाची माहिती, सुरक्षिसाठी महत्वाचे काही मुद्दे आणि इतर तपशील असतील. याच उपक्रमाचा पहिला टप्पा म्हणून पणजीत मिरामार बीच, 18 जून रस्ता आणि बांदोडकर रस्त्यावर भीक मागण्याच्या विरोधात असलेल्या कायद्याबद्दल काही होर्डिंग्स लावले आहेत.

पणजी शहरात प्रत्येक महिलेला आणि लहान मुलाला बिनघोर जागता यावं म्हणून हा उपक्रम हाती घेतला असल्याची माहिती पणजी शहराचे महापौर रोहित मोन्सेरात यांनी दिलीये.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com