Goa Weather: फेब्रुवारीतच उन्हाच्या झळा! वाढत्या तापमानामुळे गोवेकर हैराण; विजेच्या वापरात लक्षणीय वाढ

Goa weather news: गेल्या काही दिवसांपासून गोव्यात उन्हाचा तडाखा वाढला असून दुपारनंतर बाहेर फिरताना नागरिकांना घामाच्या धारा लागत आहेत.
Goa Weather
Goa WeatherDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गेल्या काही दिवसांपासून गोव्यात उन्हाचा तडाखा वाढला असून दुपारनंतर बाहेर फिरताना नागरिकांना घामाच्या धारा लागत आहेत. वाढता उकाडा नागरिकांसाठी त्रासदायक ठरत आहे. मार्चच्या मध्यापर्यंत जाणवणारे तीव्र उन्हाचे चटके यंदा फेब्रुवारीतच जाणवू लागल्यानं गोवेकर हैराण झाले आहेत.

राज्यात वाढत्या उष्णतेमुळे नागरिक त्रस्त झाले असून, उष्णतेपासून बचावासाठी एसी, कूलर आणि पंख्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. दरम्यान, राज्यातील वीज वापर दरवर्षी १० टक्क्यांनी वाढत असल्याचं एका आकडेवारीतून समोर आलंय.

उष्णतेमुळे एसी, कूलर आणि पंख्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. विजेची वाढती मागणी पुरवणे हे विजखात्यासाठी आव्हानात्मक ठरत आहे. त्यामुळे काही भागांत गेल्या काही दिवसांपासून अनियमित वीजपुरवठा होत असून, नागरिकांना याचा फटका बसत आहे. वीज खंडित होण्याच्या तक्रारीत देखील वाढ झाली आहे. 

Goa Weather
Goa Hockey: 'गोव्यातून जास्तीत जास्त ऑलिंपियन घडवायचे आहेत'! माजी हॉकीपटूंचा निर्धार; आग्नेल संकुलाच्या उपक्रमास पाठिंबा

राज्यात वाढत्या उष्णतेमुळे विजेची मागणी झपाट्याने वाढत आहे. गेल्या वर्षी विजेची मागणी ८५० मेगावॉट इतकी होती. मात्र, यंदाच्या तीव्र उष्णतेमुळे आणि एसी, कूलर व अन्य विद्युत उपकरणांच्या वाढत्या वापरामुळे आगामी काळात विजेची मागणी आणखी १० टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे.

जर ही वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी योग्य नियोजन केलं नाही, तर विजखात्याचा ताण अधिक वाढू शकतो आणि अनियमित वीजपुरवठ्याची समस्या निर्माण होऊ शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com