Panaji: रात्री होता कॅसिनो क्रूझवर, सकाळी मांडवी नदीत सापडला मृतदेह; उत्तरप्रदेशच्या पर्यटकाचा गोव्यात संशयास्पद मृत्यू

Panaji Tourist Death: पोलिसांनी प्रथमदर्शनी बुडून मृत्यू झाल्याचा निष्कर्ष काढला असला तरी शव चिकित्सेनंतरच त्याच्या मृत्यूचे गूढ स्पष्ट होणार आहे. त्याच्या हातात प्राईड कॅसिनोचा बँड आहे.
Panaji tourist death
UP tourist dies in GoaDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: सकाळच्या सुमारास मांडवी नदीच्या पात्रात एका पर्यटकाचा मृतदेह तरंगताना सापडला असून पोलिसांनी त्याचा पंचनामा करून ‘गोमेकॉ’च्या शवागारात ठेवला आहे.

या पर्यटकाचे नाव मधुर अरोरा (३९) असून तो गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथील आहे. त्याच्या कुटुंबाशी जुने गोवे पोलिसांनी संपर्क साधला असून त्यानंतरच शव चिकित्सा केली जाणार आहे. या मृतदेहाबाबत संशय असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Panaji tourist death
Goa Crime: काखेत कळसा, गावाला वळसा; भाडेकरू नोकरानेच मालकिणीला घातला 4.50 लाखांचा गंडा

मधुर अरोरा हा काही दिवसांपूर्वी गोव्यात आला होता. काल रात्री तो प्राईड कसिनोवर गेला होता. कसिनो जुगारात तो खेळल्यावर पैसे गेल्याने त्याने नैराश्‍यतेतून या कसिनो बोटीवरून पडला की त्याने कॅसिनो बोटीवरून बाहेर आल्यानंतर मांडवी नदीत आत्महत्या केली याबाबत स्पष्टीकरण झालेले नाही. हा घातपात असू शकतो.

Panaji tourist death
Goa Crime News: अंबरग्रीस तस्करी प्रकरणी मुंबईतील मच्छीमाराला अटक तर फोंड्यात घरमालकाला लुटणारा भाडेकरू जेरबंद

शवचिकित्सेनंतर गूढ उकलणार

पोलिसांनी प्रथमदर्शनी बुडून मृत्यू झाल्याचा निष्कर्ष काढला असला तरी शव चिकित्सेनंतरच त्याच्या मृत्यूचे गूढ स्पष्ट होणार आहे. त्याच्या हातात प्राईड कॅसिनोचा बँड आहे त्यामुळे तो कॅसिनोवर गेल्याचे दिसून येत असून पोलिस त्याची माहिती मिळवत आहेत. त्याच्या पँटच्या खिशात वाहन चालक परवाना सापडला असून त्यावरून त्याची ओळख पटल्याचे पोलिसांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com