Panaji Traffic Issue : काकोडा भागात वाहतूक कोंडी आता नित्याचीच

दिवसभरात वारंवार वाहतूक ठप्प होत असल्याने यातून दुचाकीही सुटू शकत नाही अशी स्थिती निर्माण होत असल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.
Goa News
Goa News Gomantak Digital Team

Panaji Traffic Issue : काकोड्यातील रस्ते खोदलेले आहेत,त्यामुळे वाहतूक कोंडीच्या घटना आता काकोडा भागात नेहमी होऊ लागल्या आहेत. दिवसभरात वारंवार वाहतूक ठप्प होत असल्याने यातून दुचाकीही सुटू शकत नाही अशी स्थिती निर्माण होत असल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.

मुख्य रस्त्यांवरील खोदकाम आता काकोडा भागात पोहचल्याने वाहतुकीचा खोळंबा होऊ लागला आहे. काकोडा, शेळपे औद्योगिक वसाहतीला जाणारी अवजड वाहतूक, खडी, चिरे, वाहतूक करणारी वाहने त्यात प्रवासी बस वाहतूक, चारचाकी वाहनाच्या दोन्हीही बाजूने मोठमोठ्या रांगा लागत असतात.

Goa News
Sanquelim Municipality Election: साखळीतील घडामोडींमुळे मतदारांत वाढती उत्सुकता

दुचाकीही सुटू शकत नाही, अशी परिस्थिती निर्माण होत असल्यामुळे वाहन चालकांची एकमेकांविरुद्ध शाब्दिक चकमक घडताना दिसते. वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलिस किंवा बांधकाम कंत्राटदाराने माणसे नेमून अडथळा होणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे.

Goa News
CM Pramod Sawant: किनाऱ्यांची सुरक्षा होणार सक्षम; 15 मीटर इंटरसेप्टर बोट गोवा पोलिसांच्या ताफ्यात दाखल

वाहतूक पोलिसांनी लक्ष घालावे !

मुख्य रस्ता वाहतुकीला अडसर वाटू लागल्यास चारचाकी, दुचाकी वाहन चालक बगल रस्त्याच्या दिशेने धाव घेतात. पण तिथेसुद्धा रस्त्याची तोडफोड झाल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झालेला असतो. अशा परिस्थितीत रूग्णवाहिका अडकल्यास रुग्ण दगावण्याची भीती व्यक्त केली जात आहे. हीच परिस्थिती अजून किमान पंधरा दिवस राहणार असल्यामुळे वाहतूक पोलिसांनी यात लक्ष घालावे,अशी मागणी होत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com