Panaji News : भाडेकरू पडताळणी अनिवार्य : पोलिस महासंचालक

Panaji News : कायद्यात सुधारणा, मसुदा कायदा विभागाकडे
Director General of Police Jaspal Singh
Director General of Police Jaspal SinghDainik Gomantak

Panaji News :

पणजी, जे लोक त्यांच्या जागेत भाडेकरू ठेवतात त्यांच्यासाठी भाडेकरू पडताळणी प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक असल्याचे पोलिस महासंचालकांनी म्हटले आहे.

पोलिस विभागाने नवीन भाडेकरू पडताळणी कायद्याचा मसुदा कायदा विभागाकडे पाठविला आहे जो नजीकच्या भविष्यात भाडेकरू पडताळणीची प्रक्रिया जलद करेल आणि त्यात जे लोक भाडेकरू पडताळणी करत नाहीत त्यांना दंड करण्याची तरतूदही असेल, असे त्यांनी सांगितले.

गोवा पोलिसांनी नुकत्याच केलेल्या भाडेकरू पडताळणी मोहिमेनंतर भाडेकरू पडताळणी प्रक्रिया पूर्ण न करता गोव्यात राहणाऱ्या १०० हून अधिक व्यक्ती आढळून आल्या. गोवा पोलिसांनी आता राज्यातील घरफोडी, चोरीच्या घटनांमध्ये झालेली वाढ लक्षात घेऊन भाडेकरू पडताळणीची प्रक्रिया गांभीर्याने सुरू केली आहे.

पत्रकारांशी बोलताना पोलिस महासंचालक जसपाल सिंग आयपीएस म्हणाले की, गोव्यात जे लोक आपली जागा भाड्याने देतात त्यांना भाडेकरूंची पडताळणी करणे अनिवार्य आहे.

सिंग यांनी नमूद केले की, पोलिस विभागाने नवीन भाडेकरू पडताळणी कायद्याचा मसुदा कायदा विभागाकडे पाठविला आहे जो नजीकच्या भविष्यात भाडेकरू पडताळणीची प्रक्रिया जलद करेल.

Director General of Police Jaspal Singh
Goa Politics: गोविंद गावडेंचे मंत्रीपद जाणार? मंत्रिमंडळ फेरबदलाचा विचार बळावला

गुन्हेगारीला आळा बसेल

पोलिस महासंचालक जसपाल सिंग यांनी नमूद केले की, भाडेकरू पडताळणी प्रक्रिया अनिवार्य आहे. कारण अनेक वेळा असे आढळून आले आहे की, इतर राज्यातील गुन्हेगार गोव्यात येतात आणि त्यांची ओळख लपविण्यासाठी काही नोकऱ्या धंदा करतात. भाडेकरू पडताळणी करून अशा गुन्हेगारांचा शोध घेतला जाईल आणि यामुळे गोव्यातील गुन्हेगारी कारवायांना आळा बसू शकेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com