Panaji Spa Ban: पणजीत 'स्पा'ना बंदी! अखेर मनपाला आली जाग; नवीन परवानग्या दिल्या जाणार नाहीत

Goa Panaji Spa: राजधानी पणजीत काही महिन्यांत ज्या पद्धतीने स्पा तथा मसाज पार्लरची संख्या वाढली आहे, त्यावरून समाजमाध्यमांतून मनपाच्या कारभारावर टीका होत आहे.
Goa Panaji Spa
Goa Panaji SpaDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राजधानी पणजीत काही महिन्यांत ज्या पद्धतीने स्पा तथा मसाज पार्लरची संख्या वाढली आहे, त्यावरून समाजमाध्यमांतून मनपाच्या कारभारावर टीका होत आहे.

या टीकेची दखल घेत महापौर रोहित मोन्सेरात यांनी यापुढे स्पाना परवानगी न देण्याचा निर्णय स्थायी समितीच्या झालेल्या बैठकीत घेतला. पणजी महानगरपालिका क्षेत्रात मागील काही वर्षांत २० ते २५ सलून ॲण्ड स्पाची निर्मिती झाली.

Goa Panaji Spa
Illegal Spa Goa: मसाज पार्लरच्‍या नावाखाली कोलव्यात वेश्‍‍याव्‍यवसाय, दोन पार्लरवर छापे; 9 युवतींची सुटका

त्यामुळे पणजी काही वर्षांत ‘स्पा’ची राजधानी होणार, अशी टीका होऊ लागली आहे. रात्री उशिरांपर्यंत चालणाऱ्या स्पामुळे राजधानीत अनैतिक कृत्येही चालत असल्याची टीका अगोदरच विरोधकांकडून होत आहे.

Goa Panaji Spa
Goa Spa Scam: गोव्यात 'स्पा'च्या नावाखाली फसवणूक? पर्यटकाने सांगितला धक्कादायक अनुभव; सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल!

महानगरपालिकेच्या निवडणुका काही महिन्यांवर आल्या आहेत. त्यामुळे वाढलेल्या स्पाच्या संख्येचा विषय निवडणुकीत महत्त्वाचा बनला जाणार, याची भीती सत्ताधारी गटाला असल्यानेच आजच्या स्थायी समितीत महानगरपालिकेला यापुढे स्पांना परवानगी न देण्याचा निर्णय घ्यावा लागला असल्‍याचे खात्रीलायक मिळालेल्‍या सूत्रांकडून समजते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com