
पणजी: स्मार्ट सिटीच्या नावावर सरकारने पणजीच्या जनतेची फसवणूक केलीये. स्मार्ट सिटीच्या संकेतस्थळावर चकचकीत फोटो लावून सरकार फक्त काम पूर्ण झाल्याचे सांगतं पण प्रत्यक्षात स्थिती वेगळीच आहे असा आरोप पणजी काँग्रेस ब्लॉक समितीने केला आहे. मंगळवारी (दि.१ एप्रिल) सकाळी पाटो येथील स्मार्ट सिटीच्या ऑफिसमध्ये पणजी काँग्रेस ब्लॉक समितीने निवेदन सादर केले.
स्मार्ट सिटी अंतर्गत पणजी शहर स्मार्ट बनवून जागतिक स्तरावर नेण्याची स्वप्ने दाखवत पणजी शहराची सुंदरता नष्ट केली जातेय असं म्हणत सरकार आपल्याला कायमच फुल बनवत आलंय असा आरोप काँग्रेस ब्लॉक समितीने केला. फक्त देखावेबाजी करून जनतेच्या डोळ्यांना पाणी लावायचे काम स्मार्ट सिटीने केल्याचे पणजी ब्लॉक काँग्रेस समितीच्या अध्यक्षा प्रतिभा बोरकर यांनी सांगितले.
जर आम्ही दिलेल्या निवेदनाची दाखल घेतली गेली नाही तर आम्ही उच्च न्यायालयात जाण्याची तयारी ठेवली आहे असं म्हणत त्यांनी स्मार्ट सिटीने पणजीच्या जनतेला एप्रिल फुल केले आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. ३१ मार्च पर्यंत होणार असलेले काम एप्रिल उजाडला तरी पूर्ण होत नाही असा आरोप पणजी ब्लॉक समितीचे सचिव श्रीनिवास खलप यांनी केला.
स्मार्ट सिटीचे नाव देऊन पणजीवासियांना मोठमोठी आश्वासनं देण्यात आली, फायदा कसा होईल हे सांगून भ्रमित गेलं गेलं. जागतिक स्थरावर पणजीचं नाव होईल अशा गोष्टी सांगून भुलवलं मात्र जागतिक पातळी सोडा पणजी शहर हे आता शहर सुद्धा राहिलेलं नाही असा आरोप समितीने केला. फुटपाथ खणून ठेवलेले आहेत, पुलांची डागडुजी नीट केलेली नाही. गेल्या १० वर्षांपासून सुरु असलेल्या या आश्वासनांच्या खेळात एक नवीन शहर उभं राहिलं असतं अशी खोचक टीका त्यांनी केली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.