Panjim Smart City: पणजी कधीच ‘स्मार्ट सिटी’ होणार नाही !

ॲड.आयरिश रॉड्रिग्स : आमदार-महापौरांच्या अहंगंडामुळे शहर अराजकतेत
Smart city project fail in panaji
Smart city project fail in panaji Dainik Gomantak
Published on
Updated on

Panaji Smart City News : पणजी शहर आमदार आणि नगराध्यक्षांच्या नाकर्तेपणामुळे आणि अहंगंडामुळे पणजी शहर अराजकतेत अकडले आहे. शहरातील रहिवाशांना आणि राजधानीला भेट देणाऱ्यांना भेडसावणाऱ्या आरोग्य आणि सुरक्षेच्या जोखमीचे प्रश्‍न पहायला मिळतात.

त्यामुळे पणजी कधीच ‘स्मार्ट सिटी‘ असणार नाही, अशी उद्विग्न प्रतिक्रिया ॲड. आयरिश रॉड्रिग्स यांनी व्यक्त केली आहे.

शहरातील काही रस्त्यांवर खड्डे पडले आहेत, तर पदपथ धोक्यात आले आहेत. आता ३० मार्च रोजी महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुका होणार असल्याने तीस नगरसेवकांनी प्रामाणिक, निःस्वार्थी आणि कर्तव्याची भावना असलेल्या दोन नगरसेवकांची निवड करावी.

आता जनतेच्या हितासाठी काम करण्याची त्यांना संधी आहे. पणजीला सध्याच्या आपत्तीतून बाहेर काढण्यासाठी हे काम नगरसेवकांनी करावे, असेही त्यांनी सूचविले आहे.

तथाकथित स्मार्ट सिटीसाठी करदात्यांच्या पैशांचा अपव्यय होऊ नये. स्मार्ट सिटीच्या कामात निष्काळजीपणा आणि भ्रष्टाचारामुळे उद्भवलेल्या आपत्ती, या स्थानिक आणि कोणत्याही सरकार प्रायोजित प्रकल्पाचे वैशिष्ट्य बनले आहे.

शंभर दिवसांत कॅसिनो हटवण्याची घोषणा करणाऱ्यांना कर्तव्याची जाणीव करून देणे आवश्‍यक आहे, असेही रॉड्रिग्स यांनी नमूद केले आहे.

Smart city project fail in panaji
Panaji News : जीटीडीसी’कडून सरकारला लाभांश

त्या’ अधिकाऱ्यांनी विश्‍वासात घेतले नाही !

पावसाळ्यात पणजीत उद्‍भवणाऱ्या पूरस्थितीसाठी आयुक्त, महापौर किंवा आमदारांना दोषी धरू नये. ‘स्मार्ट सिटी’च्या अधिकाऱ्यांनी पहिल्या दिवसापासून महापौर, आमदार, आयुक्त किंवा माझ्यासह एकाही नगरसेवकाला विश्‍वासात घेतलेले नाही.

नॅशनल थिएटरजवळ गटार खराब झाल्याने पिण्याचे पाणी दूषित केले. त्यामुळे टायफॉइड, कॉलरा असे आजार होतील. खोदकामांमुळे पेयजलाच्या जलवाहिन्या फुटत आहेत.

त्याशिवाय भूमिगत वीज वाहिन्यांनाही धक्का पोहचला असेल तर त्यातून पावसाचे पाणी गेल्यास वीज खंडित होण्याचे प्रकार घडतील, ते घडू नयेत अशी आपण प्रार्थना करतो, असेही माजी महापौर तथा नगरसेवक सुरेंद्र फुर्तादो यांनी म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com