Panaji News : जीटीडीसी’कडून सरकारला लाभांश

आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळाचा दर्जा लाभलेल्या आपल्या राज्याच्या पर्यटनाचा जगभर प्रचार, प्रसार करण्याचे काम या महामंडळाच्या वतीने करण्यात येते.
cm promod sawant
cm promod sawantdainik gomantak
Published on
Updated on

Panaji News : राज्य सरकारच्या पर्यटन विभागाच्या अखत्यारित येत असलेल्या गोवा पर्यटन विकास महामंडळाकडून (जीटीडीसी) सरकारला आज ४५ लाख २९ हजार ३८२ रुपयांचा लाभांश देण्यात आला.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे या लाभांशाचा धनादेश प्रदान करण्यात आला. यावेळी पर्यटनमंत्री रोहन खंवटे, महामंडळाचे अध्यक्ष डॉ. गणेश गावकर, पर्यटन सचिव संजीव आहुजा व व्यवस्थापक ब्रिजेश मणेरकर उपस्थित होते.

राज्य सरकारच्या अखत्यारित येत असलेली महामंडळे कार्यक्षम पद्धतीने राबवून महसूल प्राप्त करणे अपेक्षित असताना काही महामंडळे यामध्ये यशस्वी ठरत नसल्याचे लक्षात आल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी अकार्यक्षम महामंडळे बंद करण्यात येतील, असे जाहीर केले होते. त्यामुळे महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आपला महसूल जाहीर करत राज्य सरकारच्या वाट्याचा लाभांश देणे सुरू केले आहे.

cm promod sawant
Goa Petrol-Diesel Price: गोव्यात लॉंग ड्राईव्हला जायचंय? टाकी फुल्ल करण्याआधी वाचा पेट्रोल-डिझेलचे दर

पर्यटनाचा जगभर प्रचार : यापूर्वी आयडीसीने आपला लाभांश मुख्यमंत्र्यांकडे दिला होता, तर आता ‘जीटीडीसी’ने आपला लाभांशाचा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे सुपुर्द केला आहे. आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळाचा दर्जा लाभलेल्या आपल्या राज्याच्या पर्यटनाचा जगभर प्रचार, प्रसार करण्याचे काम या महामंडळाच्या वतीने करण्यात येते. या महामंडळाच्या वतीने काही हॉटेल्सही चालविण्यात येतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com