Panaji Smart City: ये रे माझ्या मागल्या! स्मार्ट सिटीतले नवे पदपथ पुन्हा खोदले, गॅस पाईपलाइनचे काम सुरु

Panaji Gas Pipeline Work: स्मार्ट सिटी मिशनअंतर्गत रस्त्याचे जे काम हाती घेण्यात आले होते, त्यातील मिनेझिस ब्रागांझा रस्त्याच्या बाजूला निर्माण केलेले पदपथ खोदावे लागले आहेत.
Panaji Gas Pipeline
Panaji Footpath Dainik Gomantak
Published on
Updated on

Panaji Smart City gas pipeline issue

पणजी: पहिल्या टप्प्यात स्मार्ट सिटी मिशनअंतर्गत रस्त्याचे जे काम हाती घेण्यात आले होते, त्यातील मिनेझिस ब्रागांझा रस्त्याच्या बाजूला निर्माण केलेले पदपथ खोदावे लागले आहेत. कारण गॅस पाइप टाकण्यासाठी ते खोदकाम केले जात असल्याचे दिसून आले आहे.

या चौकातील एका हॉटेलसाठी गॅस पाइपलाइन नेण्यात आली असल्याची माहिती हाती आली आहे. जेव्हा या रस्त्याच्या पदपथाचे काम सुरू होते, तेव्हा त्या हॉटेल मालकाला गॅस पाइपलाइन टाकून घ्यावी हे सुचले नाही.

टाकीतील गॅसचे दर सतत वाढत असल्याने आता पाईपलाईनद्वारे पुरवठा होणारा गॅस घेण्यासाठी काहीजण धावू लागले आहेत, असे दिसून येते.

Panaji Gas Pipeline
Illegal Cables Panaji: राजधानी पणजीत पुन्हा इंटरनेट सेवा विस्‍कळीत! वीज खात्‍याची धडक कारवाई; 43 वीजखांबांवरील बेकायदा केबल्स कापल्‍या

स्मार्ट सिटीअंतर्गत जी कामे करण्यात येत आहेत, त्यात रस्त्याच्या एकाच बाजूने सर्व वाहिन्या ठराविक अंतराच्या खोदकामानंतर नेल्या जात आहेत, त्यात गॅस पाइपलाइनचाही समावेश आहे.

शहरात काही ठिकाणी गॅस पाइपलाइन टाकण्याचे काम झाले असले तरी पुरवठा सुरू झालेला नाही. सांतिनेज परिसरात ग्राहक मोठ्या प्रमाणात आहेत. शहराच्या मध्य भागात पाइपद्वारे गॅसपुरवठा सेवा अनेकांनी घेतलेली नाही.

Panaji Gas Pipeline
Patto Panaji: पाटो-पणजीतील समस्या सुटणार कधी? नागरिकांचा सवाल; पालिकेचा केवळ पार्किंग शुल्कावर डोळा असल्याचा आरोप

मग खर्च का?

आता काही व्यावसायिकांना पाईपद्वारे गॅस पुरवठ्याचे महत्त्व पटू लागले असावे, असे वाटते. त्यासाठी तयार केलेला पदपथ खोदून वाहिनी टाकावी लागत आहे.

एवढा मोठा खर्च करून जर पदपथांची कामे केली असतील आणि ते पुन्हा खोदले जाणार असतील, तर कोणाचाच कोणाला पायपोस नसल्याचेच दिसून येते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com