Panaji E Bus: पणजी 'स्मार्ट बस'द्वारे 9 महिन्यांत 1.93 कोटींचा महसूल, 16.92 लाख प्रवासी; सोबत कार्बन उत्सर्जनाला आळा

Panaji Smart City E Bus: रॉड्रिग्स म्हणाले, २०२४ ते मार्च २०२५ या कालावधीत १६.९२ लाख प्रवाशांनी एकूण ८.७७ लाख किलोमीटरचा प्रवास केला आहे. या डिजिटल प्रणालीने बस सेवेत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
EV Bus Goa
EV Bus GoaDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: पणजी स्मार्ट सिटी ई-बसच्या डिजिटल व कॅश सेवेचा जुलै २०२४ ते मार्च २०२५ या कालावधीत १ कोटी ९३ लाख ४२ हजार ९६३ एवढी महसूल प्राप्ती झाली आहे, अशी माहिती इमेजिन पणजी स्मार्ट सिटी विकास लिमिटेडचे सीईओ तथा एमडी संजित रॉड्रिग्स यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

रॉड्रिग्स म्हणाले, २०२४ ते मार्च २०२५ या कालावधीत १६.९२ लाख प्रवाशांनी एकूण ८.७७ लाख किलोमीटरचा प्रवास केला आहे. या डिजिटल प्रणालीने बस सेवेत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे, ज्यामुळे कार्बन डायऑक्साईड उत्सर्जन दरमहा ६६.५ टनांनी कमी झाले. सक्षम नागरी वाहतुकीचे मॉडेल म्हणून उदयास आले आहे.

पणजीत सुरू झालेल्या स्मार्ट पब्लिक ट्रान्झिट उपक्रमांतर्गत पणजीतील महत्त्वाच्या ठिकाणी १२ मीटर ते ७ मीटर लांबीच्या अशा एकूण ४८ इलेक्ट्रिक बस सेवा देत आहेत. मध्य पणजी, मळा, भाटले, अल्तिनो, ताळगाव, सांताक्रूझ, बांबोळी, दोना पावला आणि कुजिरा या प्रमुख भागांचा या सेवेत समावेश आहे. या सात हाय फ्रिक्वेन्सी लूप मार्गांवर या बसेस धावतात. इलेक्ट्रिक मोबिलिटीला समर्थन देण्यासाठी दहा चार्जिंग स्टेशन्स उभारली आहेत.

Panaji E Bus
E BusCanva

ते पुढे म्हणाले, कदंब परिवहन महामंडळाकडून (केटीसीएल) आणि इमेजिन पणजी स्मार्ट सिटी विकास लिमिटेडकडून (आयपीएससीडीएल) एकूण १९ हजार ५३३ स्मार्ट कार्ड जारी करण्यात आले आहेत. ते कॅशलेस सेवा आणि तंत्रज्ञान सक्षम गतिशीलतेकडील पाऊल आहे. चार प्रमुख मार्गांचे कंडक्टरलेस कॉरिडॉरमध्ये रूपांतर झाल्याने डिजिटल सेवा अवलंबण्यास चालना मिळाली आहे.

EV Bus Goa
Panaji E- Bus: पणजीत पुन्हा सुरु होणार कदंबची कॅशलेस ई- बस; पहिल्या टप्प्यात सात मार्गांवर मिळणार सेवा

१) रेड रोड (लाल मार्ग, पणजी मार्केट-तळीगाव-दोना पावला-पणजी बसस्थानक) ः जिथे सहापैकी तीन बस कंडक्टरशिवाय धावतात, डिजिटल महसूल जानेवारी २०२५ मधील १४ हजार ८९२ रुपयांवरून मार्च २०२५ मध्ये ६० हजार १३१ रुपयांपर्यंत वाढला (३०४ टक्के) आहे. फेब्रुवारी (७,८५८) ते मार्च (१०,४२९) या कालावधीत प्रवासी संख्या ३३ टक्क्यांनी वाढली.

२) इंडिगो मार्ग (भाटले-सांताक्रूझ) ः या मार्गाचा फेब्रुवारीतील डिजिटल महसूल ७७,८९६ रुपयांवरून मार्च २०२५ मध्ये १,५६,३०४ रुपयांवर पोहोचला. तात्पुरते रस्ते बंद असूनही फेब्रुवारीत ८,६१२ असणारी प्रवासी संख्या मार्चमध्ये १६,४२० वर पोहोचली आहे.

३) केसरी मार्ग (मळा-ताळगाव) ः या मार्गावर सातत्याने वाढ झाल्याची दिसून आले आहे. मार्च २०२५ मध्ये डिजिटल महसूल १ लाख २८ हजार २७४ रुपयांवर पोहोचला आहे. फेब्रुवारीत ११,५९१ असणारी प्रवासी संख्या मार्चमध्ये १२,०६५ वर पोहोचली आहे.

४) हिरवा मार्ग (आल्तिनो-चर्च स्क्वेअर) ः या मार्गाने मार्च २०२५ साठी १३ रुपयांच्या ईपीकेएमसह स्थिर कामगिरी राखली आणि कंडक्टर-लेस अंमलबजावणीनंतर सातत्यपूर्ण डिजिटल महसूल वाढ केली.

EV Bus Goa
Smart City E-Bus: स्मार्ट सिटी इलेक्ट्रिक बस सेवेला गोमंतकीय प्रवाशांची पसंती!

५) पिवळा मार्ग (मिरामार-दोना पावला-बांबोळी) ः या मार्गावर दहा बसेस धावतात. जुलै २०२४ मधील १० रुपयांवरून मार्च २०२५ मध्ये २,०५,६८९ रुपयांपर्यंत डिजिटल महसूल वाढला आहे. जुलैमध्ये प्रवासी संख्या ४९,३१६ होती, ती मार्चमध्ये १,२३,८८२ वर पोहोचली आहे. एकूण प्रवासी संख्या ९.३ लाख आहे.

६) निळा मार्ग (मध्य पणजी) ः या मार्गावरील सेवेद्वारे ऑगस्ट २०२४ मध्ये ९६० रुपयांवरून मार्च २०२५ मध्ये ५१ हजार ६६२ रुपयांपर्यंत डिजिटल महसूल वाढला आहे. या कालावधीत प्रवाशांची संख्या ४,५५६ वरून २५,२२८ वर पोहोचली आहे. एकूण १.८२ लाख प्रवासी आणि १८ रुपये ईपीकेएम आहे.

७) व्हायोलेट मार्ग (मळा-सांतइनेज) ः या मार्गावरील सेवेद्वारे ऑगस्ट २०२४ मधील ६० रुपयांवरून मार्च २०२५ मध्ये ८३ हजार ७५८ रुपयांपर्यंत डिजिटल महसूल वाढला आहे. प्रवासी संख्या ४६२ वरून ३५ हजार ६०२ पोहोचली

आहे.

८) लाल मार्गाचाच एक भाग (पणजी मार्केट-तळीगाव-दोना पावला-पणजी बसस्थानक) ः वाहकांसह चालणाऱ्या तीन बसेस असून, या सेवेंतर्गत ऑगस्ट २०२४ मधील ५३० रुपयांवरून मार्च २०२५ मध्ये ४१,११९ रुपयांपर्यंत डिजिटल महसूल वाढ नोंदविली गेली आहे. मार्च २०२५ मध्ये प्रवाशांची संख्या ५,९३८ वरून १७ हजार ६८५ वर पोहोचली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com