Panaji Session Court : मडगाव शहरातील कचऱ्याच्या विल्हेवाट लावण्यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने मडगाव पालिकेला आज निर्देश दिले आहेत.
शेडमधील साठवलेल्या कचऱ्याची विल्हेवाट सप्टेंबरपर्यंत लावा यासह संरक्षक भिंत, गटारांचे बांधकाम पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण करावे, अशा सूचना पालिकेला दिल्या.
गत अनेक वर्षांपासून सोनसोडो येथे कचऱ्याचा डोंगर झाला होता. त्यामुळे तेथील काही रहिवाशांनी या कचऱ्यामुळे होणाऱ्या समस्येबाबत खंडपीठात याचिका सादर केली होती.
या न्यायालयाने वेळोवेळी निर्देश देत पालिकेला धारेवर धरले होते. दररोज सुमारे 50 टन कचरा पालिका क्षेत्रातून जमा केला जातो.
त्यामध्ये 35 टन ओला तर 15 टन सुक्या कचऱ्याचा समावेश असतो. कचरा वेगवेगळा करण्याच्या कामासाठी चार बेलिंग मशीनपैकी २ नादुरुस्त आहेत. येथे किमान 7 बेलिंग मशीनची आवश्यकता आहे.
न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार सोनसोडो येथील जुनाट कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात आली आहे, अशी माहिती खंडपीठाला देण्यात आली. यावरील सुनावणी जून महिन्यापर्यंत तहकूब केली.
पालिकेला दिलेले निर्देश
आगीचे प्रकार रोखण्यासाठी तेथे ३० दिवसांत आग प्रतिबंधक साधनसुविधा उपलब्ध करा.
जुन्या शेडमध्ये विल्हेवाट लावण्यात येत असलेला कचरा सप्टेंबरपर्यंत निकालात काढा.
विजेच्या समस्येमुळे सर्व प्रक्रिया पूर्ण करून तेथे नवा ट्रान्स्फॉर्मर दोन महिन्यात बसवा.
दैनंदिन तत्त्वावरील कचरा विल्हेवाटीसाठी आणखी एक नवीन शेड उभारा.
संरक्षक भिंत, गटारे व कपाऊंड भिंतीचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करा.
नव्या बेलिंग मशीन खरेदी करून कचरा वर्गीकरणाची गती वाढवा.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.