Goa News: दलाली संपता संपेना; पोलिस, पंचायत हतबल

मायकल लोबो-रोहन खंवटे यांच्यात पुन्हा बेबनाव
Goa News
Goa NewsDainik Gomantak
Published on
Updated on

उत्तर गोव्यातील किनारपट्टीला लागलेली संघटित दलाली आणि भिकाऱ्यांची कीड वाढतच चालली आहे. त्यासाठी केवळ पोलिस कारणीभूत नसून संपूर्ण शासकीय यंत्रणाच जबाबदार असल्याची गंभीर टीका आमदार मायकल लोबो यांनी केली आहे.

अशा गुन्हेगारांकरता मोठ्या दंडाची मागणी त्यांनी केली आहे. या विषयावरून पर्यटनमंत्री रोहन खंवटे आणि आमदार मायकल लोबो यांच्यातील वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.

उत्तर गोव्यातील किनारपट्टी भागात मोठ्या प्रमाणात अवैध व्यवसाय फोफावला असून वेश्या व्यवसाय आणि दलाली सुरूच आहे. याला पोलिस यंत्रणा जबाबदार असल्याचा आरोप पर्यटनमंत्री खंवटे यांनी केला होता.

कायदेही थिटे

पोलिस संबंधित गुन्हेगारांना अटक करून न्यायालयासमोर उभे करतात. मात्र, न्यायालय त्यांना संध्याकाळी जामीन मंजूर करते आणि परत हे सर्व गुन्हेगार आपापल्या ठिकाणी पोहोचतात.

हे सर्व थांबवण्यासाठी पर्यटन खात्याने मोठ्या दंडाची तरतूद करायला हवी, जेणेकरून अशा गैरव्यवहारांवर कडक निर्बंध येतील, असे लोबो म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com