Porvorim Flyover: पर्यायी रस्ते मिळाल्यावरच पर्वरीत उड्डाण पुलाचे काम : रोहन खंवटे

Porvorim Flyover: सुकूर, पेन्ह द फ्रान्स, साल्वादोर दु मुंद या पंचायतींचे सदस्य, बार्देशचे उपजिल्हाधिकारी तसेच विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.
Tourism Minister Rohan Khaunte Strict action would be taken against water sports operators working illegally
Tourism Minister Rohan Khaunte Strict action would be taken against water sports operators working illegallyDainik Gomantak

Porvorim Flyover

मांडवी पूल ते गिरीपर्यंतच्या राष्ट्रीय महामार्गावर उड्डाण पुलाचे काम पर्यायी रस्त्यांच्या आराखड्याविषयी मुख्यमंत्र्यांसोबत आढावा बैठक घेऊन त्यावर चर्चा करून सुरू केले जाणार आहे. त्यासाठी स्थानिक पंचायतींची मते विचारात घेतली जातील, अशी माहिती पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी दिली.

पर्वरी मतदारसंघातील विविध पंचायतींमधील वीज, पाणी, वाहतूक, आरोग्य यांच्याशी संबंधित समस्यांसंदर्भात मॉन्सूनपूर्व बैठक पंचायती व आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या विविध खात्यांच्या अधिकाऱ्यांबरोबर पर्यटनमंत्री खंवटे यांनी घेतली. यावेळी सुकूर, पेन्ह द फ्रान्स, साल्वादोर दु मुंद या पंचायतींचे सदस्य, बार्देशचे उपजिल्हाधिकारी तसेच विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.

पर्वरीतील उड्डाण पुलाचे काम अद्याप सुरू झालेले नाही. पर्वरी महामार्गावर वाहतुकीची वर्दळ असल्याने पर्यटकांची वाहने रस्त्यावर न थांबविण्याचा सल्ला दिला आहे. रस्त्यांचे रुंदीकरण करण्यासाठी तेथील झाडेझुडपे कापण्याच्या सूचना केल्या आहेत. पर्वरीच्या बाजूने अटल सेतू संपतो तेथे वळण असून या ठिकाणी पावसाळ्यात पाणी साचते.

Tourism Minister Rohan Khaunte Strict action would be taken against water sports operators working illegally
Goa Fraud Case: बंगल्यासाठी जमीन देण्याचा वादा; मुंबईच्या अ‍ॅड फिल्म डिरेक्टरला गोव्यातील दाम्पत्याचा दीड कोटींचा चुना

जलस्रोत खात्याच्या अधिकाऱ्यांना त्यावर तोडगा काढण्यास सांगितले आहे. पर्वरीत वीज खंडित होण्याची समस्या वाढत आहे. पर्वरी मतदारसंघ विकसित होत असून अनेक सरकारी कार्यालयेही येथे आहेत. त्यामुळे विजेची समस्या सोडविण्यासाठी मुख्य वीज अभियंत्यांशी चर्चा करणार आहोत, असेही खंवटे म्हणाले.

तपासणीमुळे वाहतूक कोंडी

पर्वरीत अनेक ठिकाणी तपासणीसाठी वाहने थांबविण्यात येत असल्याने वाहतुकीची कोंडी होते तसेच अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे या मार्गावर तपासणीच्या कारणास्तव वाहने थांबवू नयेत. मात्र, वाहतूक कोंडी होणार नाही, अशा ठिकाणी थांबून पोलिसांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करावी, असा सल्ला वाहतूक पोलिसांना दिला असल्याचे खंवटे यांनी सांगितले.

Tourism Minister Rohan Khaunte Strict action would be taken against water sports operators working illegally
Goa Fraud Case: बंगल्यासाठी जमीन देण्याचा वादा; मुंबईच्या अ‍ॅड फिल्म डिरेक्टरला गोव्यातील दाम्पत्याचा दीड कोटींचा चुना

अनेक सरकारी खात्यांमध्ये संवाद आणि समन्वयाचा अभाव

पेन्ह द फ्रान्स या भागात ७-८ डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आरोग्य खात्याला या भागात विषाणूनाशक फवारणीचे निर्देश दिले आहेत. सुट्टीच्या दिवशी कोणत्याही परवान्याविना रस्त्यावर चर खोदले जातात.

त्यामुळे पोलिसांना कारवाई करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. विविध सरकारी खात्यांमधील समन्वय व विसंवाद टाळण्यासाठी मामलेदारांना दर १५ दिवसांनी कामांचा आढावा घेण्यास सांगितले आहे, असेही मंत्री खंवटे यांनी स्पष्ट केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com