Panaji police station attack : बाबूश, जेनिफर यांचे पाय आणखी खोलात

ठाणे हल्ला प्रकरण : अधिकाऱ्याने पटवली ओळख
Panaji police station attack case
Panaji police station attack case Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी पोलिस स्थानकावरील हल्लाप्रकरणी मंत्री बाबूश मोन्सेरात आणि त्यांच्या पत्नी जेनिफर यांचे पाय आणखी खोलात गेले आहेत. या प्रकरणातील तपास अधिकारी तथा पणजीचे तत्कालीन पोलिस निरीक्षक सुदेश नाईक यांनी शुक्रवारी त्या दोघांसह अन्य दोन संशयितांची ओळख पटविली.

दक्षिण गोव्याचे प्रधान सत्र न्यायाधीश इर्शाद आगा यांच्यासमोर ही सुनावणी सुरू असून आज या सुनावणीस १५ संशयित गैरहजर होते. न्यायालयाने पुढील सुनावणीवेळी शुक्रवारी अनुपस्थित राहिलेल्या सर्व संशयितांना उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत.

बाबूश आणि त्यांच्या समर्थकांनी १९ फेब्रुवारी २००८ मध्ये पणजी पोलिस ठाण्यावर हल्ला केल्याप्रकरणी दक्षिण गोवा जिल्हा न्यायालयातील सुनावणीवेळी तत्कालीन पोलिस निरीक्षक नाईक यांची साक्ष नोंदवणे सुरू आहे.

Panaji police station attack case
Goa Mineral Fund: खनिज फंड वापराची मागणी मान्य : क्लॉड अल्वारिस

याआधी नाईक यांनी ब्रायन गुदिन्हो यांच्यावरील हल्ल्यातील सहभागींवर कारवाई करण्याची मागणी करत सुमारे ८०० जणांचा जमाव पोलिस ठाण्यावर नेला आणि बाबूश यांनी त्याचे नेतृत्व केले, तसेच चिथावणीखोर वक्तव्ये केल्याचेही सांगितले होते.

मागील सुनावणीवेळी नाईक यांनी, आंदोलकांनी वापरलेले दगड, बॅनर, गाड्या व इतर पुरावे न्यायालयात सादर केले होते. शुक्रवारी बाबूश, जेनिफर यांच्यासह २१ संशयित उपस्थित होते. मात्र, १५ संशयित अर्ज सादर करत अनुपस्थित राहिले.

सुनावणीवेळी सुदेश नाईक यांची साक्ष पुढे सुरू केली आणि संशयितांची ओळख पटवण्यात आली. यावेळी नाईक यांनी बाबूश, जेनिफर यांच्यासह काहीजणांची ओळख पटवली.

Panaji police station attack case
Goa Weather Update: गोव्याला 'यलो अलर्ट'; पुढील पाच दिवस बरसणार मुसळधार

मात्र, काहीजण अनुपस्थित असल्याने ओळख पटवणे कठीण जात असल्याचे सांगितले. त्यानुसार न्यायालयाने पुढील सुनावणीवेळी सर्व संशयितांची ओळख पटवली जाणार असल्याने सर्वांनी उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत. याप्रकरणी पुढील सुनावणी ७ जुलै रोजी दुपारी २.३० वाजता होणार आहे.

माविन गुदिन्हो सुनावणी तहकूब

पंचायतमंत्री गुदिन्हो यांचा सहभाग असलेल्या ४.३० कोटींच्या वीज बिल सवलत घोटाळ्याची सुनावणी साक्षीदार अरुण ब्रागांझा हे न्यायालयात हजर राहू न शकल्याने ३० जूनपर्यंत पुढे ढकलली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com