पणजी पोलिस स्थानकावर केलेल्या हल्लाप्रकरणी सुरू असलेल्या सुनावणीत नवीन अपडेट समोर आली आहे. हल्लाप्रकरणी तत्कालिन पोलिस निरीक्षक सुदेश नाईक यांनी आणखी काही संशयितांची व हल्ल्यावेळी वापरलेल्या कारची ओळख पटवली आहे.
दरम्यान, या प्रकरणाची पुढील सुनावणी 4 ऑगस्ट रोजी होणार आहे. दक्षिण गोव्याचे प्रधान सत्र न्यायाधीश इर्शाद आगा यांच्यासमोर ही सुनावणी पार पडली.
फेब्रुवारी 2008 मध्ये ताळगावचे तत्कालीन आमदार बाबूश मोन्सेरात यांच्या काही कार्यकर्त्यांना पणजी पोलिसांनी अटक केल्यानंतर विरोधी गटातील संशयितांनाही अटक करा, अशी मागणी घेऊन हा जमाव पोलिस स्थानकावर आला होता.
पोलिसांच्या आरोपपत्राप्रमाणे त्यावेळी मोन्सेरात यांनी प्रक्षोभक भाषण केल्याने जमाव खवळला आणि त्यांनी पोलिसांवर दगडफेक केली. या दगडफेकीत कित्येक पोलिस जखमी झाले.
या प्रकरणात तपास करण्यास सीबीआयने बाबूश मोन्सेरात व त्यांच्या पत्नी जेनिफर मोन्सेरात यांच्यासह एकूण 37 जणांवर आरोपपत्र दाखल केले होते.
दरम्यान, या हल्ला प्रकरणातील तपास अधिकारी सुदेश नाईक यांनी आणखी एक संशयित असलेला हनिफउल्ला खान या संशयिताची ओळख पटवली तसेच या तोडफोडीच्यावेळी फोडण्यात आलेल्या एका आल्टो गाडीचीही नाईक यांनी ओळख पटवली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.