G20 Meet in Goa: ‘जी-२०’ परिषदेच्या संपर्क अधिकाऱ्यांना प्रशिक्षण

आरोग्य कार्यगटाच्या बैठकीची पूर्वतयारी
Goa G20 Summit
Goa G20 Summit Gomantak Digital Team
Published on
Updated on

Goa G20 Summit in Panji: जी-२० परिषदेच्या गोव्यात होणाऱ्या ८ बैठकांमधील पहिली बैठक आता काही आठवड्यांमध्येच म्हणजे एप्रिल महिन्यात होणार असल्याने या बैठकीची पूर्वतयारी म्हणून पणजी नुकतीच ‘जी-२०’ संपर्क अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले.

काहीच दिवसांपूर्वी ‘जी-२०’च्या प्रतिनिधी मंडळाने गोव्यात या बैठकांच्या तयारीचा आढावा घेतल्यानंतर लगेचच संपर्क अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण होत आहे.

मंगळवारी पार पडलेल्या प्रशिक्षणामध्ये ‘जी -२०’ बैठकांसाठी गोव्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय निमंत्रितांसाठी मुख्य संपर्कबिंदू म्हणून नियुक्त झालेले संपर्क अधिकारी (लायजन ऑफिसर) सहभागी झाले होते.

प्रशिक्षणाच्या सुरवातीस ‘जी-२०’साठीचे नियुक्त विशेष साधनसुविधा आणि समन्वयन अधिकारी भूषण सावईकर यांची ओळख करून देण्यात आली.

Goa G20 Summit
Goa Employment: कलाकारांनाही सरकारी नोकऱ्या द्या; युरी आलेमाव यांची मागणी

आरोग्य, सुरक्षा, निवासावर चर्चा

संस्कृतीभवनमध्ये आयोजित या प्रशिक्षणामध्ये ‘जी-२०’ बैठकांबाबत आवश्यक आरोग्य, सुरक्षा, निवास, प्रवास, आणि इतर विषयांबाबतच्या शंका, प्रश्नांवर चर्चा घडवून त्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

या बैठकांमध्ये सहभागी निमंत्रित देशांमध्ये होणाऱ्या द्विपक्षीय चर्चांच्या सुलभीकरणाची महत्वाची जबाबदारी या संपर्क अधिकाऱ्यांवर असणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com