
पणजी: महानगरपालिकेने मार्केटमधील ४०० दुकानगाळे मालकांना कागदपत्रे सादर करण्याच्या नोटिसांची मुदत संपून गेली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे दुकानगाळे मूळ मालकाकडून विकत घेतलेल्यांशी भाडेकरार होणार का? असा प्रश्न आता उपस्थित होणार आहे.
नगरसेवक उदय मडकईकर म्हणतात, गोवा राज्य साधन सुविधा विकास महामंडळाने (जीएसआयडीसी) गाळे वाटप करताना तिसऱ्या टप्प्यातील दुकानदारांची नावे नव्या मार्केटच्या दुकानांच्या यादीत घातली. पण अनेकांनी तेथे व्यवसाय होणार नाही म्हणून गाळे विकले आहेत. त्यामुळे त्या दुकान गाळ्यांची मालकी खरेदीदारांकडे गेली आहे. हीच संख्या आता सध्या येथे असलेल्या मूळ गाळा मालकांपेक्षा अधिक असावी आणि यांच्याशी भाडेकरार करायचा झाल्यास त्यात महानगरपालिकेला कायदेशीर दुरुस्ती करावी लागेल.
मिळालेल्या माहितीनुसार १७ ते १८ वर्षांपूर्वी महानगरपालिकेत असलेल्या तत्कालीन कर लेखाधिकाऱ्याने (एटीओ) दुकानगाळे नावावर करून देण्यासाठी भाडेकरूंकडून दहा हजार रुपये प्रत्येकी घेतले होते. यासाठी कोणतीही मंजुरी घेण्यात आली नव्हती. परंतु एटीओने तेव्हा पैसे घेऊन महानगरपालिकेची पावती दुकान गाळेधारकांना दिली होती. आता तिच पावती गाळेधारकांना रक्षक कवच बनली आहे. मूळ मालकाकडून खरेदी केलेले दुकानगाळ्याची मालकी म्हणून तीच पावती दुकान मालक दाखवतात.
मार्केटमधील दुकानगाळ्यांची मालकी जीएसआयडीसीच्या यादीनुसार आहे, त्यांच्यापैकी काही गाळा मालकांचे भाडेकरार महापौर मडकईकर यांच्या काळात झाले होते. लिव लायसनला विरोध करून लीज लायसनसाठी दुकान मालकांनी हट्ट धरला आणि पुन्हा कराराची प्रक्रिया बंद पडली ती नोव्हेंबर २०२४ पर्यंत. त्याशिवाय काही मूळ दुकानमालक आता हयातीत नाहीत, त्यांच्या घरातील व्यक्तीला त्याची मालकी देऊन त्याच्याशी भाडेकरार करावा, अशी सूचनाही पुढे आली होती.
मार्केटमधील दुकानगाळे मालकांशी लीज लायसन्स भाडेकरार करण्याविषयीची फाईल गेली कित्येक महिन्यांपासून नगर विकास खात्याकडून (Urban Development Department) मंजुरीसाठी गेली आहे. परंतु त्या मंजुरीसाठी पाठपुरावाच होत नाही त्यामुळेच या कराराला विलंब होत आहे, असे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.