Panaji: पणजी महापौरपदी 'रोहित'च, उपमहापौर 'आगशीकर'; नवनिर्वाचित नगरसेवकांनाही दिली शपथ

Panaji Mayor: पणजी महानगरपालिकेच्या महापौरपदी अपेक्षेप्रमाणे रोहित मोन्सेरात यांची तर उपमहापौरपदी वसंत आगशीकर यांची बिनविरोध निवड झाली.
Panaji Mayor
Panaji MayorDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: पणजी महानगरपालिकेच्या महापौरपदी अपेक्षेप्रमाणे रोहित मोन्सेरात यांची तर उपमहापौरपदी वसंत आगशीकर यांची बिनविरोध निवड झाली. महापौरपदाच्या या कार्यकाळात पणजीतील प्रलंबित समस्या सोडवणे आणि निवडणुकीत जनतेला दिलेली आश्‍‍वासने पूर्ण करण्यावर करणे यावर आपला भर असेल, असे रोहित यांनी निवडीनंतर पत्रकारांशी बोलताना स्‍पष्‍ट केले.

महापौर आणि उपमहापौरांच्‍या निवडीनंतर मनपाच्‍या नवनिर्वाचित नगरसेवकांनाही शपथ देण्‍यात आली. काही दिवसांपूर्वी झालेल्‍या मनपाच्‍या निवडणुकीत भाजप नेते तथा पणजीचे आमदार बाबूश मोन्‍सेरात यांच्‍या पॅनलने ३० पैकी २७ जागा जिंकून निर्विवाद वर्चस्‍व मिळविले.

Panaji Mayor
Panaji: 2021 च्या जोडीचे पुनरागमन! रोहित यांचा महापौर, आगशीकरांचा उपमहापौरपदासाठी अर्ज

त्‍यानंतर महापौरपदासाठी रोहित मोन्‍सेरात आणि उपमहापौरपदासाठी वसंत आगशीकर यांनी अर्ज दाखल केले होते. या पदांसाठी दोघांचेच अर्ज आल्‍याने त्‍यांची बिनविरोध निवड झाल्‍याचे सोमवारी जाहीर करण्‍यात आले. दरम्‍यान, मनपाच्‍या स्‍थायी, बाजार आणि सार्वजनिक बांधकाम समित्‍यांचीही सोमवारी निवड करण्‍यात आली.

Panaji Mayor
Panaji Mayor: पणजीच्‍या महापौरपदी रोहित मोन्‍सेरातच! भाजपचा निर्णय; उपमहापौरपदाच्‍या शर्यतीत वसंत आगशीकर

स्थायी समितीवर रोहित मोन्सेरात, विठ्ठल चोपडेकर, रुपेश हळर्णकर, उदय मडकईकर, कबीर मखिजा आणि निकिता नाईक तर बाजार समितीवर कॅरोलिना पो, अस्मिता केरकर, किशोर शास्त्री, कीर्ती साखळकर, सिल्वेस्टर फर्नांडिस आणि विद्या गडकर यांची नियुक्ती केली. सार्वजनिक बांधकाम समितीवर शुभम चोडणकर व इतरांची नेमणूक करण्‍यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com