Panaji Mayor: पणजीच्‍या महापौरपदी रोहित मोन्‍सेरातच! भाजपचा निर्णय; उपमहापौरपदाच्‍या शर्यतीत वसंत आगशीकर

Rohit Monserrate: पणजी महानगरपालिकेच्‍या (मनपा) महापौरपदी रोहित मोन्‍सेरात यांचीच पुन्‍हा एकदा नेमणूक करण्‍याचा निर्णय भाजपने घेतलेला आहे.
Panaji Mayor
Panaji MayorDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: पणजी महानगरपालिकेच्‍या (मनपा) महापौरपदी रोहित मोन्‍सेरात यांचीच पुन्‍हा एकदा नेमणूक करण्‍याचा निर्णय भाजपने घेतलेला आहे. तर, उपमहापौर पदाच्‍या शर्यतीत भाजपचे केडर नेते वसंत आगशीकर शर्यतीत असल्‍याची माहिती भाजपच्‍या सूत्रांनी मंगळवारी ‘गोमन्‍तक’शी बोलताना दिली.

पणजी मनपा निवडणुकीचा निकाल गत १३ मार्च रोजी जाहीर करण्‍यात आला. त्‍यात भाजपच्‍या पॅनलने ३० पैकी २७ जागा जिंकल्‍या, तर विरोधी माजी मुख्‍यमंत्री स्‍व. मनोहर पर्रीकर यांचे सुपूत्र उत्‍पल पर्रीकर यांनी दिलेल्‍या पॅनलचे केवळ तीन नगरसेवक निवडून आलेले होते. त्‍यानंतर पणजीच्‍या महापौर आणि उपमहापौर पदांवर कुणाची वर्णी लागणार?

याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. या पदांसाठी येत्‍या ३० मार्चला निवडणूक होणार आहे. परंतु, गेल्‍या कार्यकाळात रोहित मोन्‍सेरात यांनी महापौर म्‍हणून दर्जेदार कामगिरी केलेली असल्‍यामुळे पुन्‍हा या पदावर त्‍यांचीच नेमणूक करण्‍याचे भाजपने निश्‍चित केलेले आहे.

Panaji Mayor
Panaji Municipal Election: उत्‍पल मांडताहेत पणजीच्‍या व्‍यथा! ‘आमी पणजेकार’चा घरोघरी प्रचार; सत्ताबदलाचा निर्धार

दरम्‍यान, पणजी मनपावर गेल्‍या अनेक वर्षांपासून मंत्री तथा पणजीचे आमदार बाबूश मोन्‍सेरात यांचेच वर्चस्‍व राहिलेले आहे. आता बाबूश भाजपात आहेत. त्‍यामुळे त्‍यांनी भाजप पुरस्‍कृत पॅनल निवडणुकीत उतरवले होते. त्‍यामुळे उपमहापौरपद भाजप केडर नगरसेवकाला देण्‍याचा विचार पक्षाने सुरू केला असून, त्‍यात आगशीकर यांचे नाव आघाडीवर आहे. उदय मडकईकर महापौर असताना आगशीकर उपमहापौर होते. त्‍यामुळे त्यांनाच हे पद मिळण्‍याची शक्‍यता वर्तवण्‍यात येत आहे.

Panaji Mayor
Panaji Municipal Election: विजयोत्सवाने राजधानी दुमदुमली! सलग 7 तास मिरवणूक; बाबूश पॅनेलवर शुभेच्छांचा वर्षाव VIDEO

...तर पुन्‍हा बदलणार महापौर

राज्‍य विधानसभेची निवडणूक मार्च २०२७ मध्‍ये होण्‍याची शक्‍यता आहे. या निवडणुकीत रोहित मोन्‍सेरात यांना ताळगावची उमेदवारी मिळवून देण्‍याचे प्रयत्‍न बाबूश मोन्‍सेरात यांनी सुरू केलेले आहेत. या निवडणुकीत रोहित मोन्‍सेरात विजयी झाल्‍यास महापौरपदी बाबूश यांच्‍या मर्जीतील नगरसेवकाची वर्णी लागणार असल्‍याचेही सूत्रांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com