
Hasty shop allotments lead to financial loss for Panaji municipality
पणजी: मनपा मार्केटमधील दुकानगाळे मालकांशी भाडेकरार न केल्याने महसुलावर पाणी फेरले आहे. मनपा व जीएसआयडीसीने घाईघाईत गाळ्यांचे वाटप केले, त्याचा फटका मनपाला सोसावा लागत आहे.
एक आठवड्यापूर्वी म्हणजे २६ नोव्हेंबरला महानगरपालिकेने मार्केट इमारतीतील ४०० दुकानदारांना नोटीस बजावली आहे आणि त्या दुकानमालकांना दुकानगाळ्यांच्या मालकीहक्काच्या मूळ कागदपत्रांसह सादर करण्याची नोटीस बजावली आहे. सात दिवसांची मुदत यासाठी महानगरपालिकेने दिली होती, ती मुदत संपून दोन दिवस उलटले. यापूर्वी अशाप्रकारच्या अनेकदा नोटिसा दुकानगाळे मालकांना यापूर्वी दिल्या गेल्या, त्यामुळे यावेळी मिळालेल्या नोटिशीविषयी फारशी भीती त्यांच्यात नाही. कारण नोटीस आली की येथील मार्केट समितीतील दुकानमालक कायदेशीर बाबी पडताळून पाहतात आणि न्यायालयीन लढाईला सामोरे जाण्याची तयारी करतात.
नवीन आधुनिक मार्केटची इमारत उभारण्यासाठी, तथा पहिल्या टप्प्यातील कामासाठी जुनी इमारत पाडण्यात आली होती. तेव्हा टप्प्यात मार्केट इमारत बांधण्याचे निश्चित झाले होते. गोवा राज्य साधनसुविधा विकास महामंडळाकडे (जीएसआयडीसी) या इमारतीचे काम दिले गेले होते. २००४ मध्ये आयोजित गोव्यातील पहिल्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाबरोबर बाजार क्षेत्रातील बहुतांश कामांप्रमाणे इमारतीचा पहिला टप्पा पूर्ण झाला. अगदी दुसरा टप्पा २००७ मध्ये तुलनेने कमी कालावधीत पूर्ण झाला. महानगरपालिकेच्या व जीएसआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी नवीन भाडेकरार न करता घाईगडबडीत नवीन बांधलेल्या मार्केटमधील दुकानगाळ्यांचे वाटप केले. तेव्हापासून भाडेकरार रखडला तो आजतागायत रखडलेलाच आहे.
महानगरपालिकेने ज्या दुकानगाळे मालकांना नोटिसा बजावल्या आहेत, त्यात भाडे भरा, असे म्हटले आहे. परंतु त्यात केंव्हापासून किती भाडे थकीत आहे, त्या रकमेचा उल्लेख नाही. त्याशिवाय ज्यांना नोटिसा मिळाल्या आहेत, त्या नोटिशीवर दुकानमालक म्हणून दुसऱ्याच व्यक्तीचे नाव आहे. सध्या जे दुकानांमध्ये व्यवसाय करीत आहेत, त्यांना दुसऱ्याच्याच नावाची नोटिस मिळाली असल्याची माहिती समोर आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे जे लोक व्यवसाय करीत आहेत, त्यांनी ते गाळे विकत घेतले आहेत. त्याशिवाय ते गेली सतरा-अठरा वर्षे याठिकाणी व्यवसाय करीत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.