पावसाळा तोंडावर पण पणजीत जीर्ण इमारतींचा प्रश्न 'जैसे थे'! अहवालाअभावी कारवाई रखडली; महापौरांचे आयुक्तांना तातडीने पाठपुराव्याचे आदेश

Monsoon Safety Goa :राजधानीतील अनेक जुन्या इमारतींची अवस्था अत्यंत जीर्ण व धोकादायक असल्याची जाणीव असूनही पणजी महानगरपालिका पुढील पावले उचलण्यात असमर्थ ठरत आहे; कारण बहुतांश इमारतींचे ‘संरचनात्मक स्थिरतेचे अहवाल’ अद्याप प्राप्त झालेले नाहीत.
Monsoon Safety Goa
Monsoon Safety GoaDainiak Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: राजधानीतील अनेक जुन्या इमारतींची अवस्था अत्यंत जीर्ण व धोकादायक असल्याची जाणीव असूनही पणजी महानगरपालिका पुढील पावले उचलण्यात असमर्थ ठरत आहे; कारण बहुतांश इमारतींचे ‘संरचनात्मक स्थिरतेचे अहवाल’ अद्याप प्राप्त झालेले नाहीत. आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत महानगरपालिका जुन्या, जीर्ण व धोकादायक इमारतींची नियमित तपासणी करत असते. मान्सून आगमन काही आठवड्यांवर येऊन ठेपले असल्याने कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत टाळण्यासाठी प्रशासन अशा असुरक्षित इमारतींच्या मजबुती व सुरक्षिततेचा आढावा घेत आहे.

महापौर रोहित मोन्सेरात यांनी सांगितले की, कोणत्या जीर्ण इमारती सर्वाधिक धोकादायक आहेत हे निश्चित करण्यासाठी महानगरपालिकेचे अभियंते गोवा अभियांत्रिकी महाविद्यालय’ यांच्याशी पाठपुरावा करत आहेत. आयुक्तांना जीर्ण इमारतींबाबत पाठपुरावा करण्याचे तसेच आणखी कोणत्या इमारती पाडाव्या लागतील याचा आढावा घेण्याचे निर्देश दिले आहेत. काही इमारती यापूर्वीच कोसळल्या असून प्रत्येक इमारतीची समस्या वेगळी आहे. त्यापैकी काही इमारतींचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. एप्रिल महिन्याच्या शेवटी ‘जीईसी’ने संरचनात्मकदृष्ट्या असुरक्षित ठरवलेली एक तीन मजली व्यापारी इमारत आणि तिच्या परिसरातील २९ तात्पुरती दुकाने पाडून टाकली होती.

Monsoon Safety Goa
Goa Mansoon Update : जोरदार पावसामुळे सत्तरी तालुक्यात पडझड सुरूच!

पणजीत १२ इमारती धोकादायक

दोन वर्षांपूर्वी सांतिनेज येथील एक बेवारस इमारत मान्सून काळात कोसळली होती. त्यानंतर महानगरपालिका व राज्य प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून ती इमारत पाडून टाकली होती. सध्या पणजीतील धोकादायक स्थितीत असलेल्या १२ इमारतींची नोंद महानगरपालिकेने केली असून त्यांच्या संरचनात्मक स्थिरतेच्या अभ्यासासाठी जीईसीला पत्र पाठवले असल्याची माहिती देण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Porvorim elevated road traffic
Monsoon Withdrawal From Rajasthan
Festival Nostalgia and Memories
Viral Video Train Accident
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com