Panaji Entertainment & Food Park: पाटो येथे मनोरंजन आणि फूड पार्क उभारण्याला प्रथम प्राधान्य- महापौर रोहित मोन्सेरात

Panaji Mayor Rohit Monserrate: पाटो येथील पार्किंग झोनमध्ये मनोरंजन-फूड पार्क उभारण्याला महानगरपालिकेचे प्रथम प्राधान्य राहणार आहे.
Rohit Monserrate
Rohit MonserrateDainik Gomantak
Published on
Updated on

Panaji Entertainment & Food Park: पाटो येथील पार्किंग झोनमध्ये मनोरंजन-फूड पार्क उभारण्याला महानगरपालिकेचे प्रथम प्राधान्य राहणार आहे. इतर जागांच्या तुलनेत ही जागा फूड पार्कसाठी अत्यंत योग्य आणि नागरी वास्तव्यापासून दूर आहे, असे महापौर रोहित मोन्सेरात यांनी सांगितले.

पाटोवर फूड पार्क उभारण्यात यावा, त्यामुळे गाडेधारकांचे बऱ्याच वर्षांपासून रखडलेला पुनर्वसनाचा प्रश्‍न सुटेल, असा प्रस्ताव आजच्या बैठकीत गाडेधारकांनी ठेवला होता, असे मोन्सेरात यांनी सांगितले. पंतप्रधानांनी सुरू केलेल्या पीएम स्ट्रीट वेंडर्स आत्मनिर्भर निधी योजनेतून गाडेधारकांना गाडे निर्मितीसाठी मदत मिळू शकते. गाडेधारकांनी इतर शहरांमध्ये फूड पार्क किंवा फूड कोर्टप्रमाणे पणजीतही तशी उभारणी करावी, अशी मागणी केली. यावर बैठकीत विचारविनिमय झाला.

Rohit Monserrate
Panaji Smart City: ‘इमॅजिन पणजी’ शरण! कामे अपूर्णच; मुदतवाढीसाठी कंपनी आज करणार विनंती अर्ज

पाटोवरील जागेवर फूड पार्क करणे योग्य ठरेल. त्याठिकाणी केवळ कार्यालये आहेत. नागरी वस्तीही त्याठिकाणी नाही, असे त्यांनी सांगितले.

Rohit Monserrate
Panaji News : आईची पुण्याई मोठी, म्‍हणून बाबांची इच्छापूर्ती; सिद्धेश श्रीपाद नाईक यांची भावना

पार्किंगचाही प्रश्‍न सुटेल

मिरामार येथील गाडेधारकांना अस्वच्छता आणि वाहतूक कोंडीमुळे हटविण्यात आले होते. पाटो येथे होणाऱ्या मनोरंजन व फूडपार्कमुळे युवकांना विविध कला सादरीकरणासाठी येथील व्यासपीठ उपलब्ध असेल. असे पार्क करण्यासाठी महत्त्वाचा पार्किंगचा प्रश्‍न असतो, सायंकाळी पाटोवरील वाहनांची संख्या कमी होते, त्यामुळे पार्किंगला जागा उपलब्ध होईल, असे मोन्सेरात यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com