Panaji Mala: मळ्‍यातील 'ती' इमारत भुईसपाट करा! खंडपीठाचा आदेश, ‘एनजीपीडीए’च्‍या जमिनीत अतिक्रमण

Illegal construction in Panaji Mala: एनजीपीडीएच्या सरकारी जमिनीत बेकायदा इमारत बांधकाम करण्यात आले असून ते पाडण्याचे निर्देश द्यावेत अशी विनंती याचिकेद्वारे केली होती.
Illegal construction in Panaji Mala
Illegal construction in Panaji MalaDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: मळा येथील उत्तर गोवा नियोजन व विकास प्राधिकरणाच्या (एनजीपीडीए) जमिनीत अतिक्रमण करून उभारण्यात आलेली बेकायदा इमारत जमीनदोस्त करण्याचा आदेश तिसवाडी उपजिल्हाधिकाऱ्यांनी जारी केला आहे. त्याची अंमलबजावणी मालकांनी करून ती जागा पंधरा दिवसांत मूळ स्थितीत पुनर्संचित करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिला आहे.

सदर इमारतीचे बांधकाम संबंधित मालकांनी जमीनदोस्त न केल्यास तिसवाडी मामलेदारांनी कारवाई करून ती जमीन मूळ स्थितीत पुनर्संचित करण्याचे निर्देश गोवा खंडपीठाने देऊन त्यावरील पुढील सुनावणी २१ एप्रिल रोजी ठेवली आहे. पणजी महापालिकेचे माजी नगरसेवक मिनिनो डिक्रुझ यांनी याचिका सादर केली होती.

Illegal construction in Panaji Mala
Panaji Smart City: आमदार हॉटेल बांधण्यासाठीच आलाय का? पर्रीकरांचे आरोप; ‘स्मार्ट सिटी’वरून मोन्सेरातवर टीकेची झोड

एनजीपीडीएच्या सरकारी जमिनीत बेकायदा इमारत बांधकाम करण्यात आले असून ते पाडण्याचे निर्देश द्यावेत अशी विनंती त्‍यांनी याचिकेद्वारे केली होती. हे बांधकाम पणजी शहराच्या चलता क्रमांक १६०च्या पीटी शिट क्र. ८६ मध्ये २४४ चौ. मी. जागेत करण्यात आले आहे.

या इमारत बांधकामाची तपासणी करून योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने २३ जानेवारी रोजी तिसवाडी उपजिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार त्‍यांनी २६ मार्च रोजी मामलेदारांनी केलेल्या चौकशीच्या आधारावर ही इमारत जमीनदोस्त करण्याचा आदेश जारी केला.

Illegal construction in Panaji Mala
Panaji Smart City: स्मार्ट सिटीला कामे पूर्ण करायला हवाय अजून वेळ; काँग्रेसने मागितली श्वेतपत्रिका

त्याबाबतची माहिती गोवा खंडपीठाला देण्यात आली. हा आदेश कामकाजात दाखल करून देऊन इमारतीच्‍या मालकांनी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची अंमलबजावणी करणे अपेक्षित आहे. त्यांनी जर ती केली नाही तर मामलेदारांना पुढील कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com