Deltin Casino: डेल्‍टीन कॅसिनोचा मार्ग होणार मोकळा! धारगळसह इतर गावांतील 36 हेक्‍टर जमीन ‘काडा’तून वगळणार

Deltin Casino Goa: राज्‍यातील पेडणे, डिचोली, बार्देश तालुक्‍यातील तिलारी प्रकल्‍पाच्‍या कमांड क्षेत्रातील हजारो एकर जमीन ‘काडा’अंतर्गत घेण्‍यात आलेली आहे.
Deltin Casino
Deltin Casino Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: धारगळमध्‍ये येत असलेल्‍या डेल्‍टीन कॅसिनोसाठीची ३३ हेक्‍टर मिळून ३६.०५ हेक्‍टर जमीन ओलिताखालील क्षेत्रातून (काडा) वगळण्‍याचा तसेच विविध ठिकाणची २९२ हेक्‍टर जमीन ‘काडा’अंतर्गत आणण्‍याचा निर्णय राज्‍य सरकारने घेतला असून, लवकरच त्‍यावर शिक्‍कामोर्तब होणार असल्‍याची माहिती सरकारी सूत्रांनी दिली. सरकारच्‍या या निर्णयानंतर डेल्‍टीन कंपनीचा धारगळमध्‍ये कॅसिनो आणण्‍याचा मार्ग मोकळा होणार आहे.

राज्‍यातील पेडणे, डिचोली, बार्देश तालुक्‍यातील तिलारी प्रकल्‍पाच्‍या कमांड क्षेत्रातील हजारो एकर जमीन ‘काडा’अंतर्गत घेण्‍यात आलेली आहे. त्‍यातील धारगळ, कळंगुट, पर्रा, आसगाव, हणजुणे, लाटंबार्से, सर्वण, तोरसे, मये आणि डिचोली या भागांतील ३६.०५ हेक्‍टर जमीन ‘काडा’तून वगळण्‍याचा तसेच डिचोली आणि पेडणे तालुक्‍यांतील मये, पेडणे, कोरगाव आणि पालये येथील २९२ हेक्‍टर जमीन ‘काडा’ अंतर्गत आणण्‍याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

Deltin Casino
Goa Casino: आठ कॅसिनोंनी थकवला 315.56 कोटी महसूल; एक प्रकरण कोर्टात; एकाचा परवाना निलंबित

काहीच दिवसांपूर्वी झालेल्‍या ‘काडा’च्‍या बैठकीतही याबाबत सविस्‍तर चर्चा झालेली आहे, असेही सूत्रांनी सांगितले.

Deltin Casino
Goa Casino Crackdown: कोट्यवधींचा महसूल थकवणाऱ्या दोन बड्या कॅसिनोंना सरकारचा दणका! परवाने केले तत्काळ रद्द; वारंवार नोटीस देऊनही मालकांचं उत्तर नाही

पावसाळी अधिवेशनात गाजला होता विषय

डेल्‍टीनच्‍या कॅसिनोसाठीच धारगळमधील ३ लाख चौरस मीटर जमीन ‘काडा’तून रद्द केल्‍याचा दावा विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी पावसाळी अधिवेशनात केला होता.

त्‍यावर अजूनपर्यंत ‘काडा’ने हे क्षेत्र अधिकृतपणे रद्द केलेले नाही. धारगळमधील ३३ हेक्टर जमीन शेतकऱ्यांनीच खासगी संस्थांना विकली आहे. ही जमीन नंतर डेल्टीन कंपनीने विकत घेतली. डेल्टीननेच ‘काडा’कडे कमांड क्षेत्रातून वगळण्यासाठी अर्ज करण्यात केला होता. मात्र ‘काडा’ने अंतिम निर्णय घेतलेला नसल्‍याचे मंत्री शिरोडकर यांनी त्‍यावेळी स्पष्ट केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com