Panaji News : ‘इंडी’ कुठपर्यंत टिकणार; भाजपचा सवाल

Panaji News : तोपर्यंत ‘इंडिया’ आघाडी टिकणार तरी का? असा सवाल भाजपचे प्रवक्ते तथा माजी आमदार दयानंद सोपटे यांनी आज भाजप कार्यालयातील पत्रकार परिषदेत उपस्थित केला.
Panaji
Panaji Dainik Gomantak

Panaji News :

पणजी, विधानसभेची २०२७ मधील निवडणूक फार दूर आहे. त्याआधी पंचायत, जिल्हा पंचायत, नगरपालिका निवडणुका होणार आहे.

तोपर्यंत ‘इंडिया’ आघाडी टिकणार तरी का? असा सवाल भाजपचे प्रवक्ते तथा माजी आमदार दयानंद सोपटे यांनी आज भाजप कार्यालयातील पत्रकार परिषदेत उपस्थित केला.

स्वतःचे अस्तित्व धोक्यात आल्याने भाजपविरोधात एकत्र आलेल्‍या नेत्यांतील मतभेद लवकरच उघड होतील, असा दावाही त्यांनी केला. ‘इंडिया’ आघाडीच्‍या नावावर स्वतःचे अस्तित्व धोक्यात आल्याने भयभीत झालेले नेते एकत्र आले आहेत. ते विधानसभेच्या ३० जागा जिंकण्याची दर्पोक्ती करत आहेत.

उत्तर गोव्यातील १६ मतदारसंघांमध्‍ये भाजपने मताधिक्य मिळवले आहे याचा अर्थ तेवढ्या जागा भाजप आताच जिंकू शकतो. उर्वरीत चार पैकी हळदोणेत ८० तर सांतआंद्रेत केवळ ७८ मते कमी पडली. कळंगुट आणि सांताक्रुझमध्ये काम करण्यासाठी पुरेसा वेळ आहे. त्यामुळे उत्तर गोव्यातील २० पैकी २० मतदारसंघ भाजप विधानसभेवेळी जिंकेल हे ‘इंडिया’ आघाडीच्या नेत्‍यांना लक्षात घ्यावे, असे सोपटे म्‍हणाले.

दक्षिण गोव्यात केवळ ९ मतदारसंघांत भाजपला मताधिक्य मिळालेले नाही. इंडिया आघाडीला विधानसभेच्या ३० जागा जिंकण्यासाठी उत्तर गोव्यात ४ जागांवर आघाडी मिळवून १३ जागा जिंकण्याचे आणि दक्षिण गोव्यात ९ जागांवर आघाडी मिळवून १७ जागा जिंकण्याचे स्वप्न पाहण्यास काहीच हरकत नाही, असा टोलाही सोपटे यांनी लगावला.

Panaji
Goa Loksabha Election Result: मांद्रे, पेडणेत खलपांना अनपेक्षित धक्का; राजकीय जाणकारांचा अंदाजही ठरला चुकीचा!

२०१७ मध्ये माझ्यासह काँग्रेसचे १७ आमदार होते. त्यापैकी किती आमदार काँग्रेस पक्ष सांभाळू शकला? २०२२ मध्ये काँग्रेसचे ११ आमदार निवडून आले, त्यापैकी किती आमदार सांभाळले? जो पक्ष आपले आमदार सांभाळू शकत नाही, तो आघाडीतील इतर घटक पक्ष सांभाळणार कसा? असा सवाल सोपटे यांनी उपस्‍थित केला.

‘आप’ हा पक्ष ‘इंडिया’ आघाडीचा बळी ठरला. दिल्ली, पंजाबमध्ये त्‍यांची कामगिरी सुमार झाली आहे. भाजपला मिळालेल्या २४० जागांची बरोबरी भाजपविरोधी एकत्र आलेले पक्ष करू शकले नाहीत. तरीही ते आनंद व्यक्त करत आहेत.

- गिरीराज पै वेर्णेकर, भाजप प्रवक्ते

लोकसभा निवडणुकीत भाजपला ५१ टक्के तर ‘इंडिया’ आघाडीला ३९ टक्के मते मिळाली. यावेळी सारे विरोधी पक्ष एकत्र आल्याने त्यांची मते वाढणे अपेक्षित होते, मात्र तसे झाले नाही. ४० पैकी २७ मतदारसंघांत भाजप आघाडीवर राहिला आहे.

- संकल्प आमोणकर, आमदार (मुरगाव)

Panaji
Goa Assault Case: धारबांदोड्यात प्राणघातक हल्ला करुन एकास लुटले, दोघांविरोधात गुन्हा नोंद

आगामी विधानसभा निवडणुकीत मांद्रे मतदारसंघातून भाजपचा उमेदवार निवडून येईल. यापूर्वी मी स्वबळावर निवडून आलो होतो, काँग्रेसमुळे नव्‍हे. म्‍हणूनच राजीनामा दिल्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीतही मी निवडून येऊ शकलो.

- दयानंद सोपटे, भाजपचे प्रवक्ते

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com