Panaji Highway : महामार्गाच्या ‘त्या’ कंत्राटदारावर कारवाई करा; निकृष्ट कामाचा आरोप

Panaji Highway : मालपेतील दरड दुर्घटनेनंतर राज्यातील विरोधी पक्षनेते आक्रमक
Panaji
PanajiDainik Gomantak

Panaji Highway :

पणजी, मालपे येथे गोवा-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर दरड कोसळून संरक्षक भिंत पडल्यामुळे या निकृष्ट कामास कारणीभूत असलेल्या कंत्राटदारावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी राज्यातील विरोधी पक्षनेत्यांनी केली आहे.

दक्षिण गोव्याचे खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांच्यासह काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर आणि आम आदमी पक्षाचे गोवा राज्य संयोजक ॲड. अमित पालेकर यांनीही या विषयावरून राज्य सरकारला घेरले आहे. कॅ. फर्नांडिस यांनी हा विषय संसदेत मांडणार असल्याचा इशारा दिला आहे. याविषयी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर

म्हणाले की, गेल्या दोन वर्षांपासून आम्ही मालपे येथील धोकादायक दरडीचा विषय गंभीर असल्याचे वारंवार सांगत आलो आहोत. भाजप सरकार जनतेच्या जीवाशी खेळत आहे. भाजप सरकारच्या तथाकथित जावई असलेल्या कंत्राटदारावर फौजदारी गुन्हा दाखल करावा.

बांधकामाच्या निकृष्ट दर्जामुळे बांबोळी ते पत्रादेवी या महामार्गावर अनेक गोमंतकीयांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. या कंत्राटदारावर तत्काळ एफआयआर दाखल करावा. त्याला काळ्या यादीत टाकावे आणि सर्व नुकसान त्याच्याकडून वसूल करावे, अशी आमची मागणी असल्याचे अमित पाटकर यांनी म्हटले आहे.

Panaji
Goa Top News: देवडी खून प्रकरण, व्हॅटमध्ये वाढ; गोव्यातील आजच्या ठळक बातम्या

पत्रादेवी ते पर्वरी या ‘एनएच-६६’ महामार्गावरील संरक्षक भिंतीचे काम निकृष्ट दर्जाचे आहे. त्याला सर्वस्वी कंत्राटदार कारणीभूत आहे. एवढी मोठी दुर्घटना झाली असतानाही उत्तर गोव्याचे खासदार श्रीपाद नाईक यांनी मात्र मौन बाळगले आहे. आम्ही हा विषय संसदेत पोचविणार आहोत.

- कॅ. विरियातो फर्नांडिस, खासदार, दक्षिण गोवा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com