Digilocker Result : ‘डिजिलॉकर’वर निकाल देणारे गोवा दुसरे राज्य

Digilocker Result : बारावीच्या प्रमाणपत्रावर विद्याशाखा नाही : विषयांची निवड विद्यालयांवर
DIGILocker
DIGILockerDainik Gomantak

अवित बगळे

Digilocker Result :

पणजी, तमिळनाडूपाठोपाठ ‘डिजिलॉकर’ या सरकारी ॲपवर दहावीचा निकाल देणारे गोवा हे दुसरे राज्य ठरले आहे.

यापूर्वी सीबीएसई बोर्डाचा दहावी आणि बारावीचा निकाल डिजिलॉकरवर उपलब्ध केला होता. गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष भगीरथ शेट्ये यांनी ‘गोमन्तक’ला ही माहिती दिली.

डिजिलॉकर शालेय प्रमाणपत्रांबरोबरच इतरही अनेक प्रकारची सरकारी कागदपत्रे मिळविण्यासाठी फायदेशीर ठरते. डिजिलॉकरमुळे ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड, पॅनकार्ड, कार नोंदणी प्रमाणपत्र, शैक्षणिक प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र इत्यादी दस्तऐवज डिजिटल स्वरूपात सांभाळून ठेवता येतात, असे ते म्हणाले.

DIGILocker
IRCTC Goa Tour Package: आयआरसीटीसीचं ‘गोवा टूर पॅकेज’! मिळेल सर्व काही बजेटमध्ये; जाणून घ्या डिटेल्स

ते म्हणाले, मंडळाच्या www.gbshsegoa.net जसा निकाल पाहता येतो, अगदी तसेच आता ‘डिजिलॉकर’वरदेखील दहावी निकाल उपलब्ध झाला आहे. डिजिलॉकरवरील कागदपत्रे कोणत्याही सरकारी कामांसाठी वैध मानली जात असल्याने गुणपत्रिका व उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र आता डिजिलॉकरवरच उपलब्ध होत असल्याने ती स्वसाक्षांकीत करणे विद्यार्थ्यांना तसे आवश्यक राहणार नाही. काही विद्यालये डिजिलॉकरबाबत अनभिज्ञ असल्यास तेथे स्व साक्षांकीत गुणपत्रिका मागितली जाऊ शकते.

दहावीत उत्तीर्ण झालेल्या सर्वांना अकरावीत प्रवेश मिळणार आहे. विज्ञान, वाणिज्य, कला किंवा व्यावसायिक विद्याशाखा असा उल्लेख बारावीच्या गुणपत्रिकेवर व प्रमाणपत्रावर नसेल असे सांगून ते म्हणाले, विद्यालयात उपलब्ध असलेले विषय, शिक्षकांची उपलब्धता, विद्यालयांची सोय आदी विचारात घेऊन विद्यार्थी विषय घेऊ शकतात. रसायनशास्र, भौतिकशास्त्रासोबत एका विद्यार्थ्याने अर्थशास्त्र हा विषय मागितला होता. विद्यालयाची परवानगी असल्याने त्याला तो विषय देण्यात आला.

शेट्ये म्हणाले की, केंद्र सरकारने ‘डिजिटल इंडिया’अंतर्गत २०१५ साली डिजिलॉकरची सुविधा सुरू केली होती. नागरिकांना आवश्यक असेल तेव्हा त्यांची संबंधित अधिकृत कागदपत्रे डिजिटल स्वरूपात कुठेही, कधीही उपलब्ध व्हावीत, यासाठी भारत सरकारने या ॲप्लिकेशनची निर्मिती केली होती.

मे २०२४ पर्यंतच्या आकडेवारीनुसार, २७० दशलक्ष लोक या ॲप्लिकेशनचा वापर करतात. आधार कार्ड, विम्याची कागदपत्रे, पॅन कार्ड, वाहन चालवण्याचा परवाना अशी विविध कागदपत्रे सहजगत्या या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होऊ शकतात. वापरकर्त्यांनी या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आतापर्यंत ६.७ अब्ज कागदपत्रे मिळविली आहेत. माहिती तंत्रज्ञान नियम, २०१६ च्या ९ अ नियमानुसार, डिजिलॉकरवर उपलब्ध असलेली कागदपत्रे ही प्रत्यक्षातील कागदपत्रांप्रमाणेच वैध मानली जातात.

शिक्षण क्षेत्रात आघाडीवर

असलेल्‍या गोव्‍याने उत्तुंग भरारी मारताना ‘डिजिलॉकर’वर दहावी परीक्षेचा निकाल देण्‍याची किमया साधली. ९२.३८ टक्के एवढा निकाल लागला. गोमंतकीय विद्यार्थ्यांनी घेतलेली ही मोठी झेप आहे. त्‍यामुळेच गोवा आणि यशवंत गोमंतकीय विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा

वर्षाव होत आहे.

डिजिलॉकरमध्ये अकाउंट कसे तयार कराल?

  • सरकारी वेबसाईट digilocker.gov.in वर जा.

  • ‘साईन अप’ या पर्यायावर क्लीक करा.

  • नाव, जन्मतारीख, ई-मेल आयडी इत्यादी सर्व आवश्यक माहिती भरा.

  • तुम्ही दिलेल्या नंबरवर एक ओटीपी येईल.

  • हा ओटीपी किंवा फिंगरप्रिंट पर्याय वापरून पुढील प्रक्रिया पूर्ण करा.

  • तुमचे युजरनेम आणि पासवर्ड तयार करून लॉग इन करा.

DIGILocker
IRCTC Goa Tour Package: आयआरसीटीसीचं ‘गोवा टूर पॅकेज’! मिळेल सर्व काही बजेटमध्ये; जाणून घ्या डिटेल्स

‘डिजिलॉकर’ किती सुरक्षित आहे?

इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाच्या डिजिटल इंडिया उपक्रमांतर्गत ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे हे सरकारी ॲप असून ते तयार करताना सुरक्षेसंदर्भात आवश्यक त्या सर्व खबरदाऱ्या घेतल्या आहेत.

डिजिलॉकरच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, त्यावरील डेटाच्या सुरक्षिततेसाठी सर्वतोपरी काळजी घेण्यात आली आहे. या प्लॅटफॉर्मला २०४८ बिट आरएसए एसएसएल एन्क्रिप्शन असून लॉगीन करताना ओटीपीद्वारे पडताळणी करावी लागते.

प्लॅटफॉर्मवर आलेल्या वापरकर्त्याने ठरावीक काळ कोणतीही कृती न केल्यास त्याला आपोआप लॉग आऊट केले जाते. तसेच प्लॅटफॉर्मवर केल्या जाणाऱ्या प्रत्येक कृतीसाठी वापरकर्त्याच्या संमतीची गरज असते. त्यामुळे प्लॅटफॉर्मवरील माहिती सहजासहजी चोरीला जाणे शक्य नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com