Panaji: होड्या, जाळी म्हणजे कचरा न्हवे! रॅम्प नसल्याने आमची अडचण; पणजीतील पारंपरिक मच्छीमारांनी मांडल्या व्यथा

Panaji Fishermen Demand: पणजी परिसरातील पारंपरिक मच्छीमारांच्या होड्या लावण्यासाठी रॅम्प तयार करून देण्याची मागणी करण्यात आली.
Panaji, fishermen, boats, ramp, traditional boats
Panaji, fishermen, boats, ramp, traditional boatsDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: पणजी परिसरातील पारंपरिक मच्छीमारांच्या होड्या लावण्यासाठी रॅम्प तयार करून देण्याची मागणी करण्यात आली. महापौरांनी नुकतीच मांडवी किनाऱ्यावरील वॉक-वेची पाहणी केली होती, तेव्हा मच्छीमारांना होड्या हटविण्याची सूचना केली होती. त्याला मच्छीमारांनी आक्षेप घेतला आहे. महिला काँग्रेसच्या वतीने घेतलेल्या पत्रकार परिषदेस प्रतिभा बोरकर व इतर सदस्य, पारंपरिक मच्छीमार उपस्थित होते.

मच्छीमार परशुराम नाईक यांनी सांगितले की, किनारी वॉक-वे होण्यापूर्वी भगवान महावीर उद्यानाला लागून असलेल्या मांडवी किनाऱ्यावर पारंपरिक होडीतून मासेमारी केली जात होती. आता त्याठिकाणी वॉक-वेमुळे दगडाचा भराव टाकल्याने किनारा नष्ट झाला आहे. वॉक-वे होण्यापूर्वी याठिकाणी मासे, खुबेही मिळायचे. आता वॉक-वे झाल्याने येथे खुबे मिळत नाहीत. पारंपरिक मासेमारी व्यवसाय करून किमान चाळीसच्यावर कुटुंबे उदरनिर्वाह करीत आहेत.

Panaji, fishermen, boats, ramp, traditional boats
Panaji Mala: मळ्‍यातील 'ती' इमारत भुईसपाट करा! खंडपीठाचा आदेश, ‘एनजीपीडीए’च्‍या जमिनीत अतिक्रमण

आश्वासनेच मिळाली

आम्ही येथे कोणताही कचरा करीत नाही. जाळी आणि होड्या किनाऱ्यावर आणून ठेवल्या जात असल्याने तो त्यांना कचरा वाटत असावा. आम्हाला होड्या पाण्यातून बाहेर काढण्यासाठी रॅम्प नसल्याने आमची अडचण झाली आहे. आम्ही मुख्यमंत्र्यांकडे हा प्रश्न गतवर्षीही मांडला होता. आमदार तथा महसूल मंत्री बाबूश मोन्सेरात यांच्याकडेही हा प्रश्न मांडण्यात आला; परंतु त्यांनी केवळ आश्वासन दिले असल्याचे मच्छीमारांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com