Minor girl Assault: मतिमंद मुलीवर लैंगिक अत्याचार; क्रूर पित्याला 10 वर्षांची कारावासाची शिक्षा

Panaji fast track court: विश्वासघाताच्या आणि क्रूरतेच्या एका प्रकरणात, पणजी येथील फास्ट ट्रॅक विशेष न्यायालयाने एका वडिलांना त्यांच्या २१ वर्षीय, मतिमंद असलेल्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याबद्दल दोषी ठरवले आहे.
Goa Crime
Goa CrimeDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: विश्वासघाताच्या आणि क्रूरतेच्या एका प्रकरणात, पणजी येथील फास्ट ट्रॅक विशेष न्यायालयाने एका वडिलांना त्यांच्या २१ वर्षीय, मतिमंद असलेल्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याबद्दल दोषी ठरवले आहे.

न्यायालयाने आरोपीला भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६ नुसार १० वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. सोबतच विनयभंग करणे आणि दिव्यांग व्यक्ती हक्क कायद्यांतर्गत अतिरिक्त शिक्षादेखील सुनावली आहे. आरोपी ५ जुलै २०२३ पासून कोठडीत असल्याने २ वर्षे ४ महिने आणि २९ दिवस या शिक्षेतून माफ केले जाणार असल्याचेदेखील न्यायालयाने स्पष्ट केले.

Goa Crime
Goa Politics: भाजप शिस्तीला आव्हान! संजना वेळीप काँग्रेसमध्ये; आजगावकर उमेदवार उभे करण्याच्या तयारीत

परदेशात काम करणाऱ्या पीडितेच्या आईला एका नातेवाईकाकडून एक त्रासदायक व्हिडिओ क्लिप मिळाली आणि जुलै २०२३ मध्ये हा प्रकार उघडकीस आला. या क्लिपमध्ये वडील त्यांची मुलगी झोपलेली असताना तिला अयोग्यरित्या स्पर्श करत असल्याचे दिसत होते. धक्का बसलेल्या आणि व्यथित झालेल्या आईने तत्काळ गोव्यात परतण्याचा निर्णय घेतला आणि लगेच दुसऱ्याच दिवशी त्या कुवेतवरून गोव्यात परतल्या.

Goa Crime
Goa ZP Election: भाजपची तिसरी यादी जाहीर! जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी आणखी 9 उमेदवारांची नावे निश्चित; आतापर्यंत 38 जागांवर कमळाचे उमेदवार

गोव्यात परतल्यावर, तिने आपल्या मुलीला विचारले, तेव्हा त्या मुलीने आपले मौन सोडले. वडिलांनी घरातच चार वेगवेगळ्या प्रसंगी तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे तिने सांगितले. त्यांनी तिला कोणालाही न सांगण्याची धमकी देऊन गप्प राहण्यास भाग पाडले होते. तक्रार दाखल करण्याच्या आधी चार दिवसांपूर्वीच वडिलांनी मुलीवर शेवटचा लैंगिक अत्याचार केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com