Electricity Price Hike : वीज दरवाढीचा शॉक; प्रतियुनिट ३.५० टक्क्यांचा झटका

Electricity Price Hike : ग्राहकांच्या खिशाला बसणार झळ
Electricity price hike
Electricity price hikeDainik Gomantak

Electricity Price Hike :

पणजी, राज्यभरातील सर्व प्रकारच्या वीज ग्राहकांना उद्यापासून (ता.१६) प्रतियुनिट ३.५० टक्के दरवाढ लागू करण्यात आली आहे. संयुक्त वीज नियामक आयोगाकडे दरवाढीसाठी राज्याच्या वीज खात्याने अर्ज केला होता.

त्यानुसार जानेवारी महिन्यात घेतलेल्या जनसुनावण्यांनंतर आयोगाने वीज दरवाढीचा आदेश जारी केला आहे.

सर्वसाधारणपणे एका घरात ३०० युनिट वीज दर महिन्याला वापरली जाते, असे गृहित धरले तर प्रत्येक घराचे बिल वीज दराने ७५ रुपयांनी आणि अधिभार जमा करता १३० ते १५० रुपयांनी वाढणार आहे.

हॉटेलसाठी लागणाऱ्या विजेच्या दरातही युनिटमागे तब्बल ४० पैसे वाढ करण्यात आली आहे. उद्योगांसाठीही वीज ४० पैसे युनिट दरानेच महाग झाली आहे. वीज खात्याला ही दरवाढ जनतेला

Electricity price hike
Goa Todays Update: जीएसटी कौन्सिलच्या कायमस्वरुपी सदस्यपदावरुन मॉविन गुदिन्हो यांची उचलबांगडी

माहीत व्हावी, यासाठी तीन वर्तमानपत्रांत प्रसिद्ध करावी लागणार असून खात्याच्या संकेतस्थळावरही दरवाढीची माहिती द्यावी लागणार आहे.

आदेश मिळाल्यापासून आठवडाभरात याची अंमलबजावणी व्हावी, असेही आयोगाने स्पष्ट केले आहे. वीज दरवाढीचे समर्थन करताना वीज खात्याने आयोगाला दिलेल्या उत्तरात म्हटले आहे, की घरगुती वापराच्या वीज ग्राहकांसाठी सरासरी २ रुपये ८७ पैसे युनिट दराने बिल आकारले जाते, तर वीज खरेदीचा दर सरासरी ५.६८ रुपये प्रतियुनिट आहे.

महसुलातील तोटा भरून काढणार : राज्य सरकारने आयोगाला २०२२-२३ वर्षापासूनच्या तोट्याची माहिती देत दरवाढीची मागणी केली होती. त्यामुळे ही दरवाढ पूर्वलक्षी प्रभावाने लागू होणार की नाही, हे समजलेले नाही. सध्या ५ रुपये ३४ रुपये प्रतिकिलोवॅट दराने वीज विकली जाते. त्यात आता ५.५९ रुपये प्रतिकिलोवॅट दर लागू होणार आहे. आयोगाने वीज खात्याला २०२२-२३ मधील ३२८.८२ कोटी रुपये, २०२३-२४ मधील २१९.५१ कोटी रुपये, २०२४-२५ मधील २०९.३१ कोटी रुपये महसुलातील तोटा या दरवाढीच्या निमित्ताने भरून काढण्यास मान्यता दिली आहे.

अनुदान असतानाही दरवाढ

राज्य सरकारने वीज खात्याचा तोटा भरून काढण्यासाठी ४१४.७३ कोटी रुपयांची तरतूद केली असतानाही उद्यापासून (ता.१६) ३.५० टक्के वीज दरवाढ लागू होणार आहे. संयुक्त वीज नियामक आयोगाने तसा आदेश जारी केला आहे. राज्य सरकारच्या वीज खात्याने या दरवाढीसाठी आयोगाकडे याचिका दाखल केली होती. त्या याचिकेवर ८ जानेवारीला पणजीत तर ९ जानेवारीला मडगाव येथे जनसुनावणी घेतली होती.

अधिवेशनात जाब विचारणार : वीज दरवाढीबाबत गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई विधानसभा अधिवेशनात जाब विचारतील. या दरवाढीला पक्षाने विरोध केला होता, असे दुर्गादास कामत म्हणाले.

श्रीपाद नाईक यांना ऊर्जा खात्याच्या मंत्रिपदाचा ताबा मिळाल्यानंतर गोमंतकीयांना वीज दरवाढीचा हा बसलेला पहिला धक्का आहे. भाजप सरकारने आपले रंग जनतेला दाखविणे आता सुरू केले आहे. ही दरवाढ तत्काळ मागे घेतली जावी.

- गिरीश चोडणकर, काँग्रेस नेते.

आता लोकसभा निवडणुका संपल्यावर राज्य सरकारने जनतेला वीज दरवाढीची भेट दिली आहे. या कृतीतून सरकारने पुन्हा एकदा त्यांना सर्वसामान्य जनतेचे काहीच पडून गेलेले नाही, हेच सिद्ध केले आहे.

- दुर्गादास कामत, सरचिटणीस, गोवा फॉरवर्ड.

कायद्यानुसार वीज दरवाढ मागावी लागते. आयोगाने आदेश दिला म्हणजे पालन करावे लागेल. केंद्र सरकारने सौरउर्जा निर्मितीसाठी सवलत देणे सुरू केले आहे. प्रत्येकाने तशी वीजनिर्मिती केली तर घरगुती वापरासाठी विजेचे बिलच येणार नाही.

- सुदिन ढवळीकर, वीजमंत्री.

वाणिज्य

युनिट जुना दर नवा दर

०-१०० ३.६० ३.७५

१०१-२०० ४.४० ४.६०

२०१-४०० ५ ५.३०

४०० हून जास्त ५.३० ५.७५

उद्योग

०-५०० ३.६० ४

५०० हून जास्त ४.२५ ४.६५

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com