Panaji News : गुरे हाकलण्यासाठी पोलिसांचा वापर नको! रेखा डिसिल्वा

Panaji News : गुन्हेगारांचा शोध व दर कमी करण्याची कामे सोपवा
Panaji
Panaji Dainik Gomantak

Panaji News :

पणजी, रस्त्यांवरील भटकी गुरे हटवण्यासारखी कामे पोलिसांना देऊ नये. तसेच एकाच वेळी अनेक कामात गुंतवू नये.

पोलिसांना केवळ गुन्हेगारांचा शोध लावण्यासाठी तसेच गुन्हेगारीचा दर कमी करण्याची कामे दिली पाहिजेत, असे राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या सदस्या रेखा डिसिल्वा यांनी सांगितले.

पणजी येथे आयोजित मानवी तस्करीविरोधी एक​ दिवसीय परिषदेत गोव्यातील उच्च स्तरीय पोलिस कर्मचारी आणि मानवी तस्करीविरोधी विविध संस्थांच्या सदस्यांना संबोधित करताना डिसिल्वा पुढे म्हणाल्या की, गोवा पोलिस काही प्रसंगी व्हीआयपींना सुरक्षा प्रदान करणे, गजबजलेल्या रस्त्यांवरील भटकी गुरे हटविणे इत्यादी अनेक कामांमध्ये गुंतलेले असल्याचे आढळून आले आहेत.

Panaji
Goa Today's Top News: राज्यातील ठळक बातम्यांचा आढावा एका क्लिकवर

असली कामे पोलिसांची नाहीत, पोलिसांकडे मानवी तस्करी आदी गंभीर समस्या सोडवण्यासारखी अनेक महत्त्वाची कामे आहेत, असे त्या म्हणाल्या.

डिसिल्वा पुढे म्हणाल्या की, गोवा पोलिसांना त्यांच्या कौशल्याशिवाय इतर काम देऊ नये. पोलिसांना फक्त गुन्हेगारांचा शोध लावण्यासाठी आणि गुन्हेगारीचा दर कमी करण्याची कामे दिली पाहिजेत.

Panaji
Cashew Fest Goa 2024: हुर्राक, फेणी, काजूचे पदार्थ, लाईव्ह म्युझिक आणि बरेच काही; शुक्रवारपासून गोव्यात काजू महोत्सव

पोलिसच खरे हिरो

डिसिल्वा यांनी असेही नमूद केले की, गुन्हे आणि गुन्हेगारांना सामोरे जाताना पोलिस कोणती जोखीम घेत आहेत हे ओळखण्यात आम्ही अपयशी ठरतो.

मानवी तस्करी प्रकरणांमध्ये गुंतलेल्या गुन्हेगारांना शोधण्यासाठी आणि प्रकरणाला त्याच्या तार्किक निष्कर्षापर्यंत नेण्यासाठी गोवा पोलिसांकडून बरेच प्रयत्न केले जातात. पोलिस हेच खरे हिरो आहेत जे लोकांसाठी आपला परिसर सुरक्षित ठेवत आहेत, असे त्या म्हणाल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com